Header Ads

 • Breaking News

  इलेक्ट्रॉनिक मिडियातर्फे जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

  अहमदनगर । DNA Live24 - शिवजयंती निमित्त इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या हस्ते झाला. यावेळी पत्रकार महेश देशपांडे, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे सुशील थोरात, संतोष आवारे, निखील चौकर, आमीर सय्यद, सौरभ गायकवाड, शुभम टाके, सतीश कुर्‍हाडे, महेश मनोरे, सागर ढाले, राहुल दरंदले आदिंसह खेळाडू उपस्थित होते.

  मन्सूर शेख यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळाडूवृत्ती अंगीकारण्याचे सांगितले. तसेच युवकांना मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन केले. महेश देशपांडे म्हणाले की, युवक देशाची खरी शक्ती आहे. त्यांच्या विचार व कृतीतून समाजात विकासात्मक बदल घडणार आहे. युवकांनी व्यवसनाच्या आहारी न जाता सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा व निरोगी जीवनासाठी व्यायामाकडे वळण्याचा संदेश दिला. प्रास्ताविकात निखील चौकर यांनी स्पर्धेची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत सुशील थोरात यांनी केले. उपस्थितांचे आभार संतोष आवारे यांनी मानले. दहा दिवस वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये क्रिकेटचे सामने रंगणार आहे. यामध्ये ३२ संघांनी सहभाग नोंदवला आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad