Header Ads

 • Breaking News

  हैदराबाद कसोटी : बांगलादेशचा पहिला डाव ३८८ वर आटोपला


  हैदराबाद । DNA Live24 - येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव ३८८ धावांत संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांना अनपेक्षित प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव संपुष्टात आणण्यात रविवारी चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना यश आले. बांगलादेशचा पहिला डाव 388 धावांत संपुष्टात येऊनही भारताने त्यांना फॉलोऑन न देता फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले.

  बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमचे शतक आजचे वैशिष्ट्य ठरले. रहिमने १२७ धावा काढल्या. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी मिळविले. तर, आश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. आजच्या दिवसाच्या पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने मेहदी हसनला त्रिफळाबाद करून भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर रहिमने तळाच्या फलंदाजांबरोबर छोट्या-छोट्या भागीदारी करत आपले शतक पूर्ण केले. अखेर आश्विनने रहिमला १२७ धावांवर बाद करत बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. लंचला खेळ थांबला तेव्हा भारताच्या बिनबाद १ धावा झाल्या होत्या.

  भारताकडे अद्यापही तब्बल ३०० धावांची आघाडी आहे. भारतात भारताची फिरकी तिसऱ्या दिवशी निष्प्रभ करता येते, हे बांगलादेशच्या पाचव्या जोडीने दाखवून दिले होते. आघाडीचे तीन फलंदाज पाऊणशतकापूर्वीच बाद झालेल्या बांगलादेशच्या रहिम, शकीब आणि मेहदी हसन मिर्झा यांनी चिवट प्रतिकार केला. त्यांनी भारताला गोलंदाजीच्या व्यूहरचनेबाबत विचार करायला भाग पाडले. पहिले दोन दिवस भारतीय फलंदाजांशीच जास्त मैत्री राखलेल्या रहिमने सुरवात खराब असताना धाव पूर्ण करण्यासाठी घेतलेली झेप बांगलादेशचा प्रतिकार दाखवून देणारी होती.

  जडेजाने यष्टिरक्षक साहाकडे चेंडू थ्रो केल्याचे पाहिल्यावर रहिमने झेप घेतली. साहाने बेल्स उडवल्या, त्या वेळी रहिमच्या बॅटचा खांदा क्रिझच्या रेषेवर होता. टीव्ही पंचांनी त्याला नाबाद ठरवले, त्या वेळी त्याच्या धावा होत्या ८१. यानंतर याच रहिमने शकीबसह १०७ व मिर्झासह ८७ धावांची नाबाद भागीदारी केली. आता भारताची फलंदाजी सुरू आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad