Header Ads

 • Breaking News

  हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षेत फिरोदियाचे विद्यार्थी चमकले

  अहमदनगर । DNA Live24 - डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत अ. ए. सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील इ. सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. जिल्ह्यातील एकूण ५४ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयातील १७ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत विक्रमी निवड झाली. या परिक्षेत शाळेची विद्यार्थिनी ईशा बेंडाळे हिने जिल्ह्यात प्रथम, तर तनया चेमटे ने द्वितीय येवून, गुणवत्ता यादित विक्रमी संख्येने येण्याचा बहुमान शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला.

  या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा, शरदराव रच्चा, मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक विलास औटी, पर्यवेक्षक सुनील खिस्ती, राजेंद्र बेद्रे, रविंद्र लोंढे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक सतीश गुगळे, अर्चना पिल्ले, राधिका पंचारिया, सुषमा मुदगल यांचे मार्गदर्शन लाभले. छायाताई फिरोदिया यांनी गुणवत्तेची यशस्वी परंपरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी कायम राखल्याचे मत व्यक्त करुन, गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. 

  या परिक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादित चमकलेले शाळेचे विद्यार्थी पहिली- ईशा बेंडाळे, दुसरी- तनया चेमटे, पाचवा- आभा देशमुख, सातवी- ऋतुजा गर्जे, प्रमोदकुमार कुटे, आठवी- संजीवनी एकशिंगे, अकरावा- देवेन्द्र कवडे, बारावी- शिवांजली बेळगे, पंधरावा- श्रीनाथ उबाळे, पंधरावी- ऋतुजा कुलकर्णी, साक्षी कराळे, सोळावा-शांतनू भूकन, ऋचा पालवे, आठरावी- नंदिनी बेरड, एकोणीसावा- चैतन्य वाळके, एकविसावा- श्रेयस व्यवहारे व अथर्व शेळके.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad