728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नामांकित डॉक्टरांच्या निवासस्थान, दवाखान्यावर छापे

पुणे । DNA Live 24 - पुणे आयकर विभागाच्या गुन्हे अन्वेषण पथकाने पुण्यातील नऊ नामांकित आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं निवासस्थान आणि दवाखान्यावर छापे टाकले आहेत. नोटाबंदीच्या काळात नोटांचा भरणा आणि बिलिंग यांच्यात विसंगती आढळल्यामुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शनिवारी (दि.११) सकाळी आणि दुपारी पुण्यातील डॉक्टरांच्या घरी आणि क्लिनिक्सवर आयकर विभागाने छापे टाकले. अधिकाऱ्यांकडून दिवस-रात्र डॉक्टरांची झडती आणि चौकशी सूरु होती. यामध्ये काही डॉक्टर शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये काम करतात, तर काही स्वतःच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. यापैकी दोन डॉक्टर जोडपी आहेत. अचानक नऊ डॉक्टरांवर आयकर विभागाच्या पडलेल्या या छाप्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच धांदल उडाली आहे.

छापा टाकलेल्यांमध्ये अस्थिरोग व सांधेप्रत्यारोपण तज्ज्ञ (ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन) डॉ. सचिन तपस्वी, स्त्रीरोग व आयव्हीएफ तज्ञ डॉ. सुनिता तांदुळवाडकर, स्त्रीरोगतज्ञ डॉ. अविनाश फडणीस, आयुर्वेद तज्ञ डॉ. समिर जमदाग्नी, ह्रदयरोगतज्ञ डॉ. इश्वर झंवर, रेडिओलॉजिस्ट डॉ. केदार भाटे व त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी भाटे, ह्रदयरोगतज्ञ डॉ. सुहास हरदास व त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट वर्षा सुहास हरदास यांचा समावेश आहे.

हे सर्व नऊ डॉक्टर शहरातील नामांकित रुग्णालयात कार्यरत आहेत. मध्यंतरीच्या नोटाबंदीच्या काळात त्यांनी केलेला नोटांचा भरणा व बिलिंग यांच्या माहितीत आढळलेल्या विसंगतीमुळे हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाचे (गुन्हे अन्वेषण विभाग) अतिरिक्त आयुक्त राजेश महाजन यांनी दिली आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नामांकित डॉक्टरांच्या निवासस्थान, दवाखान्यावर छापे Rating: 5 Reviewed By: DNA Live24