Header Ads

 • Breaking News

  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अनिरूध्द देवचक्के

  अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अहमदनगर शाखा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अनिरूध्द देवचक्के तर कार्याध्यक्षपदी किशोर मरकड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पदाधिकारी निवडीसाठी डी.एम.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. त्याला कार्याध्यक्ष आणि केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे यांनी कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत मान्यता दिली.

  नुतन पदाधिकार्‍यांमध्ये डॉ. शरद सांब (उपाध्यक्ष), डॉ. शितल म्हस्के (उपाध्यक्ष), प्रा. डॉ. चं. वि. जोशी (कार्यवाह), प्रा. गणेश भगत (सहकार्यवाह), प्रा. एन. बी. मिसाळ (कोषाध्यक्ष). चंद्रकांत पालवे (केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी) यांचा समावेश आहे. या बैठकीत डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांना सन्माननीय सदस्य म्हणून कार्यकारिणीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अधिदेशक म्हणून प्रा. डॉ. मेधा काळे आणि स्विकृत सदस्य म्हणून अरविंद ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली. 

  कार्यकारिणीत दशरथ खोसे, वसंत लोढा, प्रा. डॉ. खासेराव शितोळे, प्रा. श्याम शिंदे, शिल्पा रसाळ, ल. धो. खराडे, निसार शेख यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डी. एम. कांबळे, प्रा. डॉ. लिला गोविलकर, प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, डॉ. क्रांतीकला अनभुले आणि महादेव कुलकर्णी यांना सल्लागार समितीत मानाचे स्थान देण्यात आले आहे. यावेळी चंद्रकांत पालवे आणि डी. एम. कांबळे यांच्या हस्ते नुतन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सर्व पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
  निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के यांनी साहित्य परिषदेच्या भविष्यातील वाटचाली संदर्भात आपली भुमिका मांडली. नविन लेखकांना लिहिण्यासाठी आणि वाचकांना मराठी वाचण्यासाठी प्रवृत्त करणे हा उद्देश नजरेसमोर ठेऊन अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. लेखक व वाचकांमध्ये सुसंवाद, परिसंवाद, चर्चासत्र, साहित्य संमेलने यांचे आयोजन, वाचन, लेखन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन, नगरमध्ये येणार्‍या मान्यवर लेखकांशी गप्पागोष्टी, नाट्य संहिता लेखकांमध्ये समन्वय अशा काही उपक्रमांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

  महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य क्षेत्रातील शिखर संस्था आहे. या संस्थेचा मान सन्मान उंचाविण्याबरोबरच साहित्य रसिकांच्या मनातही तेवढेच आदराचे स्थान मिळविण्याचा प्रयत्न कार्यक्षेत्रातील सर्व मान्यवर लेखक, साहित्यिक, कवी तसेच सर्वांना बरोबर घेऊन नक्कीच करू, असा विश्‍वास कार्याध्यक्ष किशोर मरकड यांनी व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी कार्यवाह डॉ. चं. वि. जोशी यांनी आभार मानले.

  यावेळी अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के व कार्याध्यक्ष किशोर मरकड यांनी विविध समिती व अध्यक्षांच्या नांवाची घोषणा केली. त्यात लेखक-वाचक समन्वय समिती - दशरथ खोसे, परिसंवाद -चर्चासत्र संयोजन समिती - वसंत लोढा, वाचन-लेखन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन समिती - प्रा. डॉ. खासेराव शितोळे, स्वागत व गौरव समिती- अरविंद ब्राह्मणे, नाट्य लेखक समन्वय समिती- प्रा. श्याम शिंदे आणि प्रसिध्दी समिती- शिल्पा रसाळ यांचा समावेश आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad