Header Ads

 • Breaking News

  साहित्यिकांनी व्यवस्थेतील प्रश्नांवर उत्तरे शोधावीत - संजय कळमकर

  अहमदनगर । DNA Live24 - लेखनातून समाज व व्यवस्थेविषयी फक्त प्रश्‍न मांडण्यापेक्षा साहित्यिकांनी त्यावरची उत्तरे शोधावीत, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. प्रा. राजेंद्र शेटे लिखित ‘रातराणी’ या कविता संग्रहाचे प्रकाशन मराठा पतसंस्थेच्या सभागृहात कळमकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

  या कार्यक्रमाला प्राचार्य खासेराव शितोळे, रामकृष्ण कर्डिले, अ‍ॅड. सविता बाळ बोठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना कळमकर म्हणाले, फक्त प्रश्‍न मांडून वाचकांना कोड्यात टाकण्यापेक्षा साहित्यिकांनी त्यावर पर्याय सूचवावेत. प्रदुषित सामाजिक वातावरणावर निव्वळ शाद्बिक कोरडे ओढल्याने परिवर्तन होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. शेटे सामाजिक बांधिलकी असलेले कवी असल्याचा प्रत्यय त्यांच्या कवितांमधून येतो. नवसाहित्यकांनी तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता अखंड वाचले पाहिजे.

  प्रा. शेटे यांनी मनोगतातून कविता निर्मितीचा प्रवास उलगडला. यावेळी प्रा. सिताराम काकडे, शितोळे, कर्डिले यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमास अ‍ॅड. शिवाजी कराळे, राजेंद्र म्हस्के, सदाशिव तळेकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किशोर मरकड, सुदर्शन शिंदे, प्रा. पोपट काळे, बबन खिलारी, कुंदा गुंजाळ, कल्याण ठोंबरे, गांगर्डे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन लता म्हस्के यांनी केले तर प्राचार्य प्रकाश कराळे यांनी आभार मानले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad