Header Ads

 • Breaking News

  सरकारविरुदध पवार ठोठावणार सुप्रिम कोर्टाचा दरवाजा

  कोल्हापूर । DNA Live24 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पद्मविभूषण शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा खणखणीत इशारा द‍िला आहे. मोदी सरकारने अचानक पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. राज्यातील सहकारी बँकांनी तब्बल ८ हजार ६०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. पण, तरीही अद्याप मोदी सरकारने सहकारी बँकांना नव्या नोटा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. म्हणून हे पाऊल उचलावे लागत असल्याचे शरद पवार म्हणाले.

  राज्यातील संपूर्ण सहकारी बँकांमधून ८ हजार ६०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सरकारला काही निर्देश दिले आहेत. पण, त्यावर सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे पवार कोल्हापुरात म्हणाले. अचानक नोटाबंदी केल्यानंतर सहकारी बँकांना काही दिवस जुन्या नोटा स्विकारण्यास परवानगी देण्यात आली होती. 

  या काळात सहकारी बॅंकांनी जुन्या नोटा स्विकारल्या होत्या. पण, नंतर ही परवानगी रद्द करण्यात आली. परिणामी बॅंकांमध्ये जुन्या नोटा पडून होत्या. त्या बदल्यात ग्राहकांना नव्या नोटा देता आलेल्या नाही. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकरण्याची परवानगी दिली, मात्र, नव्या नोटा देण्याची दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या भूमिकेनंतर आता सरकारची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad