Header Ads

 • Breaking News

  काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे बुडते जहाज - कर्डिले

  अहमदनगर । DNA Live24 - राज्यात आणी नगर जिल्ह्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे जहाज बुडायला लागले. या जहाजाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदारबाळासाहेब थोरात यांना भगदाड पाडायला सुरवात केलीय. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घुलेंनी या जहाजाचा नांगर रूतवुन ठेवण्याचे काम केले, अशी टीका भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे प्रचारसभेत ते बाेलत हाेते.

  नगर तालुक्‍यातील शेळके, गाडे यांनी कार्ले, हराळ व प्रताप शेळके यांना वाचवण्यासाठी या बुडत्या जहाजात उड्या मारायला लावल्या असेही आमदार कर्डिले म्हणाले. वाळकी गटातील उमेदार स्वाती कार्ले व गणाचे उमेदवार रविंद्र कडूस यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, हिवरेबाजारच्या पोपटराव पवारांनी व त्यांच्या गावकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून गावाचे नाव केले,तुम्ही मात्र बबन पाचपुते, राम शिंदे व माजी मंत्री विखे यांचा निधी घेऊन त्यावर ठेकेदारी केली.

  तालुक्‍याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या हराळांनी स्वार्थापोटी विखे घराण्याच्या पायाशी लोळण घालतात, हे या गटातील जनतेच्या लक्षात आल्याने तरूण वर्गाने व महिला वर्गाने तुमची साथ सोडून रविंद्र कडूस, स्वाती बोठे यांच्या साथीला आले आहेत, असेही कर्डिले या भाषणात म्हणाले. यावेळी रमेश भामरे, दत्ता कडूस, दादा चितळकर, रेवण चोभे, दिलीप भालसिमग यांची भाषणे झाली.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad