Header Ads

 • Breaking News

  काँग्रेसच्या उमेदवाराने केली मतदान यंत्राची पूजा

  पुणे | DNA Live24 - महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी होत असलेल्या मतदानावेळी प्रभाग क्रमांक २२ मध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळाला. याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार व माजी महापौर चंचला कोदे आणि उपमहापौर बंडू गायकवाड यांनी चक्क मतदान यंत्राची पूजा केली.

  या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून राजकीय कार्यकर्त्यांना इतक्या संख्येने मतदान यंत्राजवळ का जाऊन देण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.  दरम्यान, पुणे महापालिकेचे निवडणूक निर्णय आधिकारी सतीश कुलकर्णी यांनी याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून आतापर्यंत शहरातील विविध भागात पैसे वाटण्याच्या,गाड्या फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आजच्या मतदान यंत्राची पूजा करण्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आता निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात कशाप्रकारची भूमिका घेण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad