Header Ads

 • Breaking News

  शिर्डीत साई संस्थानवर IAS अधिकारी नेमण्याचे आदेश

  अहमदनगर । DNA Live24 - जगातील श्रीमंत देवस्थानांमध्ये समावेश असलेल्या साई संस्थानाचा कारभार आयएएस अधिकाऱ्याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळं वर्षाला  ४०० कोटींचं उत्पन्न असणाऱ्या साई संस्थानाचा कारभार, १५ मार्च २०१७ पासून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या हाती सोपवावा लागणार आहेत.

  अडीच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं साईबाबा संस्थानाचा कार्यकारी अधिकारी आयएएस दर्जाचा असावा असा निर्णय दिला होता. मात्र त्यावर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेत त्या निर्णयावर स्थगिती आणली होती. त्यानंतर मात्र राजेंद्र गोंदकर आणि संदीप कुलकर्णी यांनी राज्य सरकराच्या भूमिकेविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णय कायम ठेवला आहे.

  वार्षिक ४०० कोटी उत्पन्न असणाऱ्या साई संस्थानाकडे आज १८२६ कोटी रुपयांच्या विविध बँकांत ठेवी असून, ३७१ किलो सोने, तर ४३४० किलो चांदी आहे. आता लवकरच या संस्थानवर आयएएस दर्जाचा अधिकारी नियु्क्त होणार असल्याचे उत्सुकता आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad