Header Ads

 • Breaking News

  रोडरोमिओना मुलींनी चोपले

  श्रीगोंदा । DNA Live24 - महाविद्यालयीन मुलींची छेडछाड काढणाऱ्या चार रोडरोमिओंना मुलींनी भर रस्त्यात चोपल्याचा प्रकार श्रीगोंदा शहरात घडला. विद्यार्थिनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीनंतर चौघेही तोंड लपवत फरार झाले.

  कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींचा गेल्या पंधरा दिवसांपासून चार रोडरोमियो पाठलाग करत छेड काढीत होते. मुलींनी याप्रकाराला वैतागून घडत असलेला प्रकार नातेवाईकांच्या कानावर घातला होता. त्यामुळे नातेवाईकही आज छेडछाड काढत असलेल्या रस्त्यावर दबा धरून बसले होते. 

  मुली कॉलेजमधून परत येत असताना या चौघांचे टोळके पुन्हा छेडछाड काढण्यासाठी मुलींचा पाठलाग करू लागले असता या मुलींनी रस्त्यात थांबून त्यांना जाब विचारला. एकीने तर त्यातील एकाच्या श्रीमुखात लगावली. तितक्यात नातेवाईकही तेथे पोहचले. आणि या दोन मुली आणि नातेवाईकांनी  मिळून त्या चौघांची भर रस्त्यातच धुलाई केली. विद्यार्थिनींच्याकडून मार खावा लागल्यामुळे मारहाणीनंतर चौघेही तोंड लपवत फरार झाले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad