Header Ads

 • Breaking News

  भाजयुमोच्या उपाध्यक्षपदी सुरज बाबर, मंगेश घाडगे

  पुणे । DNA Live24 - पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी सुरज बाबर आणि मंगेश घाडगे यांची निवड करण्यातआली. पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते बाबर व घाडगे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

  यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी खासदार गजानन बाबर, भाजप प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर सरचिटणीसबाबू नायर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे आदी उपस्थित होते. सूरज बाबर हे माजी खासदार गजानन बाबर यांचे चिरंजीव आहेत. मंगेश घाडगे हे शिक्षण मंडळाच्या माजी उपसभापती दिवंगत शैलजा दत्तात्रयघाडगे यांचे चिरंजीव आहेत. सूरज बाबर यांनी प्राधिकरणातील टोरनॅटो या क्रिडा क्षेत्रातील संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. हिंदवी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि मोहननगर येथील अष्टविनायक मित्रमंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad