Header Ads

 • Breaking News

  'दिल दोस्ती' १८ फेब्रुवारीपासून 'दोबारा'

  मनोरंजन । DNA Live24 - झी मराठी या वाहिनीवर गेल्या वर्षी आलेल्या दिल दोस्ती दुनियादारी या ‍मालिकेने अल्पावधीतच मराठी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. घरातील अगदी लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या मालिकेवर भरभरून प्रेम केले. ठराविक भाग पूर्ण केल्यानंतर ही मालिका संपली. मात्र, त्यातील पात्रांनी रसिकांच्या मनावर केलेले गारुड अद्यापही कायम आहे. हीच पात्र आता १८ फेब्रुवारीपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

  दिल दोस्ती दुनियादारी
  या मालिकेत आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मीनल आणि अॅना या पात्रांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. पण, ही मालिका ठराविक भागांचीच होती. मराठीतील इतर मालिकांप्रमाणे सुरुवात चांगली झाल्यानंतर अनेकदा मालिकेचे भाग निष्कारण वाढवले जातात. त्यामुळे नंतर त्या मालिकाही रटाळवाण्या होत जातात. प्रेक्षकांना नाईलाजाने त्या सहनही कराव्या लागतात. पण, दिल दोस्ती दुनियादारीचे तस झाले नाही. त्यांनी ठराविक भागांतच ही मालिका संपवली.

  दिल दोस्ती दुनियादारीने ठराविक भागांतच रसिकांची मने जिंकून घेतली. त्यामुळे मालिका संपूनही त्यातल्या आठवणी व कलाकारांच्या चर्चा घराघरात, कॉलेजच्या कट्ट्यांवर होत होत्या. आत ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'दिल दोस्ती दोबारा' हे या मालिकेच्या दुसऱ्या भागाचे नाव असणार आहे. १८  फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेदहा वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या ‍मालिकेचा प्रोमो झी मराठीनं शेअर केला आहे. त्यालाही यु ट्युबवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad