728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अति दारूसेवनामुळे जाणाऱ्या बळींचा आकडा वाढला

अहमदनगर । DNA Live24 - पांगरमल (ता. नगर) येथील बनावट दारूच्या अतिसेवनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ९ झाली आहे. तर नगर व पारनेर तालुक्यातील अति मद्यसेवनामुळे दगावलेल्यांची संख्या बारावर गेली आहे. अतिमद्यसेवनामुळे मनमाड रोडवरील एका रुग्णालयात अॅडमिट असलेल्या भास्कर बन्सी आव्हाड यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. तर कौडगाव (ता. नगर) येथील नरेंद्र शकले (वय ३८) यांचाही मंगळवारी दुपारी मृत्यू झाला आहे.

पांगरमल गावात एका राजकीय उमेदवाराने दिलेल्या दारुच्या पार्टीत बनावट दारुचे अतिसेवन केल्यामुळे पोपट रंगनाथ आव्हाड, राजेंद्र खंडू आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड, प्रभाकर पेटारे हे चौघे जण सुरुवातीला दगावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिरोजी नाना वाकडे, राजेंद्र भानुदास आव्हाड हे दोघे दगावले. गेल्या गुरूवारी शहादेव भाऊराव आव्हाड यांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी रात्री उद्धव मुरलीधर आव्हाड (रा. आव्हारवाडी, ता. नगर) हेही मयत झाले होते. आता मंगळवारी पहाटेच भास्कर आव्हाड यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पांगरमल दारुकांडात बळी गेलेल्यांची संख्या अाता नऊ झाली आहे.

या बनावट दारुसेवनामुळे पांगरमल गावावर शोककळा पसरली आहे. गेल्या आठवड्यात पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथेही अति मद्यसेवनामुळे दोघे जण दगावले होते. त्यांना पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केलेले होते. इतर काही रुग्णांवरही पुण्यात उपचार सुरू होते. नगर तालुक्यातील कौडगाव येथील काहींना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलेले होते. त्यापैकी नरेंद्र शकले यांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. अति दारुसेवनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच असून पांगरमल गावावर शोककळा पसरली आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अति दारूसेवनामुळे जाणाऱ्या बळींचा आकडा वाढला Rating: 5 Reviewed By: DNA Live24