Header Ads

 • Breaking News

  डम्परने दोघांना चिरडले

  राहुरी । DNA Live24 - राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील पिता-पुत्राला भरधाव डम्परने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली.

  संक्रापूर येथील रसीद चाँदभाई शेख हे नाशिक येथील साडूला भेटण्यासाठी नविनच घेतलेल्या युनिकॉन मोटारसायकलवर पत्नी शमीनाबी व मुलगा परवेझला घेवून चालले होते. मोटारसायकल नाशिकला ठेवून ते एका कार्यक्रमासाठी बसने कोळपेवाडी येथे गेले. कार्यक्रम आटोपून ते पुन्हा नाशिकला गेले. तेथून ते पत्नी शमीनाबी व एकुलता एक मुलगा परवेझ (वय 9 वर्ष) यास घेवून सिन्नरमार्गे घरी परत येत असताना सिन्नर घाटात समोरुन येणार्‍या डंम्परने (क्र. एम.एच. 15 सी.के. 4922) मोटार सायकलला जोरदार धडक दिली. 

  डंम्परच्या धडकेने शमीनाबी बाजूला फेकल्या गेल्या तर रसीद चाँदभाई शेख (वय 37 वर्ष) व परवेझ या दोघांच्याही अंगावरुन डम्परचे चाक गेल्यामुळे पिता-पुत्राचा जागेवरच अंत झाला. आसपासच्या नागरिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या शमीनाबी यांना तातडीने दवाखान्यात हलविले. सिन्नर येथील अपघातात मयत झालेल्या शेख पिता-पुत्रावर दवणगाव येथे शोकाकूल वातावरणात दफन करण्यात आले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad