728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अॅड. रियाज पठाण खून खटला : अारोपींना जिल्ह्यांतर्गत कारागृहात वर्ग करा

श्रीरामपूर । DNA Live24 - चार वर्षांपूर्वी नेवासे येथील वकील रियाज पठाण यांची गोळ्या झाडून हत्या झाल्या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी श्रीरामपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात नियमितपणे सुरू झाली. या खटल्यातील आरोपी सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असल्याने वेळेत हजर होऊ शकले नाही. त्यामुळे सर्व आरोपींना जिल्ह्यांतर्गत कारागृहात वर्ग करावेत, असे आदेश न्यायाधीश आर. डी. पाटील यांनी दिले आहेत. आता या खटल्याची पुढील सुनावणी मार्च रोजी होणार आहे.

प्रवीण पोपट खारचंद (१९), मनोज सुरेश लष्करे, आबाजी ऊर्फ भगवान रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरूला, सचिन चंद्रकांत चव्हाण, अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे ऊर्फ सोनू लष्करे (सर्व नेवासे), सुनील ऊर्फ सोन्यामोहन परदेशी (औरंगाबाद) हे आरोपी येरवडा कारागृहात आहेत. यातील विलास पोपट जिरे हा जामिनावर मुक्त आहे. सादिक बशीर शेख हा अद्याप फरार आहे, तर सोपान भगवान गाडे हा वर्षभरापूर्वी नगर येथून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला आहे.

२६ नोव्हेंबर २०१३ रोजी एका जमीन खरेदी प्रकरणासाठी मयत अॅड. रियाज पठाण हे नेवासे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. त्यावेळी पवन नरोला, सादिक शेख सचिन चव्हाण यांनी पठाण यांचे हात धरले. तर आरोपी प्रवीण खरचंद याने पठाण यांच्यावर गोळ्या घातल्या. गोळीबारानंतर आरोपी पळून गेले. नंतर प्रविण खरचंद तहसील कचेरीजवळच असलेल्या पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला होता. सुरूवातीला तो अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नंतर तो सज्ञान असल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली होती. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अॅड. रियाज पठाण खून खटला : अारोपींना जिल्ह्यांतर्गत कारागृहात वर्ग करा Rating: 5 Reviewed By: DNA Live24