Header Ads

 • Breaking News

  ‘निलफलक’ कर्तुत्ववान व्यक्तींच्या कार्याला उजाळा देणारा - फिरोदिया

  अहमदनगर । DNA Live24 - शहराविषयी आत्मियता बाळगून जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. रसिक ग्रुपचा निलफलक उपक्रम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून या निमित्ताने या शहराच्या कर्तुत्ववान व्यक्तींच्या कार्याला उजाळा मिळून देणारा व प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले. रसिक ग्रुप आयोजित मास्टर हबीब कव्वाल यांच्या निवासस्थानी निल फलकाचे अनावरण करताना ते बोलत होते.

  अध्यक्षस्थानी महापौर सुरेखा कदम होत्या. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सचिन जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, उद्योजक करीम हुंडेकरी, अशोक जोशी, नगरसेवक नजीर शेख, कवी सय्यद खलील, सतीश मैड, उबेद शेख, इकबाल सय्यद, रियाज शेख, मुजाहिद कुरेशी, हबीब खान, कदीर सर, डी. एम. कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी फिरोदिया म्हणाले, हबीब कव्वाल यांनी या शहराचे नाव कव्वालीच्या माध्यमातून सर्वदूर नेले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना मनापासून आनंद होत आहे. महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, थोर व्यक्तींचे कार्य जनतेपर्यंत जाणे हे तरुणांना मार्गदर्शक प्रेरणा देत असते. यामुळे एकात्मतेचे वातावरण तयार होते. निल फलकाचे कार्य हाच संदेश असून, या थोर मंडळींना आज वंदन करण्याचा दिवस आहे. अशा उपक्रमांना पालिकेचे सर्व सहकार्य असेल.

  सचिन जाधव म्हणाले, हबीब कव्वाल हे आमच्या प्रभागात राहत होते. ही आम्हा सर्व जनतेच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. सुभाष गुंदेचा यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षण नसूनही आपल्या कव्वाली अदाकारीच्या माध्यमातून हबीब कव्वाली यांनी एकात्मतेची ज्योत तेवत ठेवली व मोलाचे योगदान दिले. उबेद शेख व सय्यद खलील यांनी हबीब कव्वाल यांच्या कार्याचा आढावा घेतला. समाजातर्फे त्यांना योग्य तो सन्मान न झाल्याची खंत व्यक्त केली.

  सतीश मैड, नगरसेवक शेख, डि. एम. कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी प्रास्तविक केले. स्वागत निस्सार बागवान यांनी केले तर आभार नसिर अब्दुल्ला यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिपाली देऊतकर, आबीद दुलेखान, सुदर्शन कुलकर्णी, विनायक वराडे, महेमुद शेख, मुस्ताफा खान, फिरोज शेख प्रयत्नशील होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा होशिंग यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad