Header Ads

 • Breaking News

  श्री मार्कंडेय शाळेने पद्मशाली समाजाला दिशा देण्याचे काम केले - खासदार गांधी

  अहमदनगर । DNA Live24 - विडी वळणारा व हातमाग चालवण्याची ओळख असलेल्या पद्मशाली समाजाला मार्कंडेय शाळेने दिशा देण्याचे काम केले. समाजाच्या प्रगतीसाठी ही संस्था उभी राहिली. समाजात चांगली परिस्थिती निर्माण झाली. यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे. शालेय शिक्षणाबरोबर संस्थेने व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले. श्री मार्कंडेय विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

  यावेळी आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, जालना नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल, संस्थेचे अध्यक्ष शरद क्यादर, उपाध्यक्ष रमेश सब्बन, सचिव विलास पेद्राम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, डॉ. अशोक वासलवार, नगरसेविका वीणा बोज्जा, हिरालाल पडगाल, वसंतराव येमूल, दशरथ गोप, डॉ. रत्ना बल्लाळ, बाळकृष्ण सिद्दम, क्रीडाधिकारी प्रमोदिनी गड्डमवार, अरविंद चन्ना, सविता रंगा, बाळकृष्ण गोटीपामूल उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पद्मजा सुरकुटला यांनी केले. उपस्थितांचे आभार बाळकृष्ण गोटीपामूल यांनी मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.  यावेळी सोमनाथ केंची, नागनाथ बुध्दवाड, शालिनी गोसकी, रावसाहेब क्षेत्रे, पांडुरंग गोने, श्रीनिवास मुत्त्याल, संजय गंभीरे, दिपक रामदिन, सरोजनी रच्चा, विठ्ठलमंगलारम, श्रीनिवास बोज्जा, अरुण अमृतवाड, चंद्रकांत मिठापेल्ली, नागभूषण दुर्गम, शंकर कुंटुरकर, अनिल आचार्य, संभाजी जगदाळे, शिवाजी अन्नमवार, मीना परदेशी आदि उपस्थित होते.

  माजी विद्यार्थी समीर गायकवाड व अंजली देवकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी माजी लोकप्रतिनिधींनी शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची परतफेड त्यांना निवडणुकित भोगावी लागल्याचे स्पष्ट केले. तसेच मार्कंडेय मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी खासदार गांधी यांच्याकडे त्यांनी मागणी केली. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनुराधा मिसाळ यांनी अनुभव विशद केले.
    
  मार्कंडेयने विद्यार्थी घडवले - पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी वाटचाल असलेल्या संस्थेच्या सुवर्ण पद्म स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप म्हणाले, विकासात्मक दिशा देण्याचा मुलभूत पाया शिक्षण आहे. सर्व सामान्य घटकातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य मार्कंडेय शालेने केले. संस्थेला येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्यासाठी सर्व परीने सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले. कैलास गोरंट्याल म्हणाले की, कष्टकरी व होतकरु असलेला पद्मशाली समाज आहे.
  वर्ग डिजिटल करु - खासदार गांधी म्हणाले, संस्थेची वाटचाल प्रगती पथावर असताना बदलत्या काळानुसार इंग्रजी माध्यम शाळा सुरु करण्याची गरज आहे. सर्व सामान्य कामगारांची मुले मार्कंडेय शाळेत शिक्षण घेत आहे. त्यांना संगणकीय ज्ञान मिळण्यासाठी व प्रत्येक वर्ग डिजिटल होण्याकरिता निधी देण्याचे आश्‍वासन दिले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत विलास पेद्राम यांनी केले. प्रास्ताविकात रावसाहेब क्षेत्रे यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीच्या प्रगतीचा आढावा घेतला.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad