Header Ads

 • Breaking News

  अखेर ओवेसींना परवानगी मिळाली, भवानीपेठेत सभा

  पुणे । DNA Live 24 - महापालिका प्रचारासाठी एमआयएम खासदार असरुद्दीन ओवेसींच्या प्रचार सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. नंतर काही अटी घालून पोलिसांनी त्यांना सभेला परवानगी दिली आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील एमआयएम उमेदवार जुबैर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी 14 फेब्रुवारीला सभेचे आयोजन करण्यात आले होते.

  सभेचे ठिकाण हे संवेदनशील भाग असून या ठिकाणी विविध पक्षांच्या प्रचार सभा आणि रॅली सुरु आहेत. ओवेसींचं भाषण हे प्रक्षोभक आणि जातीवाचक असून त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सभेला परवानगी नाकारण्यात येत आहे, असं पोलिसांनी सुरुवातीला पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.

  त्यामुळे एमआयएमला सभेसाठी आता दुसरे ठिकाण शोधावे लागणार आहे. त्यामुळे एमआयएमकडून सभेसाठी कोणती पर्यायी जागा निवडली जाते, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पुण्यासह 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. नंतर एमआयएमने सभेसाठी दुसरे ठिकाण दर्शविले. त्यामुळे नंतर पोलिसांनी परवानगी दिली. त्यामुळे आता भवानी पेठेमध्ये ओवेसींची प्रचारसभा होणार आहे. आता या सभेत ओवेसी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad