Header Ads

 • Breaking News

  चर्मकार समाजाचा शनिवारी वधुवर परिचय मेळावा

  राहुरी । DNA Live24 - जिल्हा चर्मकार समाज सेवा समितीच्यावतीने संत रविदास महाराज चर्मकार समाज वधुवर सूचक व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील स्वस्तिक चौक येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात शनिवारी (दि. 25) सकाळी १०  ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेळावा होणार आहे, अशी माहिती जिल्हा चर्मकार समाज सेवा समितीचे अध्यक्ष आदिनाथ बाचकर यांनी दिली. या वधुवर मेळाव्याचे यंदाचे नववे वर्ष असून, मेळावा तेरावा आहे.

  या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील मुला-मुलींचे लग्न सोहळे घडवून आणणे, सुलभ होण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सचिव सुभाष चिंधे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, लोकनेते सीताराम घनदाट सामाजिक प्रतिष्ठानचे सर्जेराव गायकवाड, रामराव ज्योतिक, जिल्हा चर्मकार समाज सेवा समितीचे अध्यक्ष आदिनाथ बाचकर, उपाध्यक्ष सूर्यभान शिंदे, अरुण शिंदे, सचिव आजिनाथ खरात, कार्याध्यक्ष संभाजी साळे, सहसचिव अरविंद कांबळे, विलास जतकर, खजिनदार अरुण गाडेकर, दिगंबर गाडेकर, केंद्रप्रमुख श्रीपती ठोसर, बाळासाहेब धस, महिला प्रतिनिधी रुक्मिणी नन्नवरे परिश्रम घेत आहेत. कारभारी देव्हारे, वसंत देशमुख, नानासाहेब दळवी, विश्‍वनाथ कानडे, गिरीष केदार, मधुकर बनसोडे, सुरेश बोरसे, सुभाष सोनवणे, प्रकाश जाधव, अनिल राजभोज, दत्ता क्षिरसागर यांचेही सहकार्य आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad