Header Ads

 • Breaking News

  कांदा व्यापाऱ्याची फसवणूक करुन १९ लाखांना गंडवले

  अहमदनगर । DNA Live24 - कांदा खरेदीच्या नावाखाली पश्चिम बंगालमधील काही जणांनी नगरच्या व्यापाऱ्याची १९ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर २०१६ मध्ये नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घडला आहे. याप्रकरणी नगरच्या एका व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसांनी चौघांविरुद्ध आर्थिक अपहार फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

  संजय बबन वायभासे (२७, अवसरकर मळा, सारसनगर) या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. पश्चिम बंगालच्या डिलक्स इंटरनॅशनल, एम. एस. एंटरप्रायजेसच्या मन्सूर अली, अन्वर मन्सूर शेख, रज्जाक अली (सर्व राहणार मालदा, पश्चिम बंगाल) यांनी डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान वायभासे यांच्याकडून ३२ लाख ८१ हजारांचा कांदा खरेदी केला. तो माल पश्चिम बंगाल येथे पाठवून त्यापोटी १३ लाख रुपये वायभासे यांच्या बँकखात्यावर जमा केले. उर्वरित रक्कम देण्यास मात्र आरोपींनी टाळाटाळ केली.

  वायभासे यांनी आरोपींना वेळोवेळी फोनवरुन संपर्क साधून उर्वरित रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी उर्वरित रक्कम देता वायभासे यांची फसवणूक केली. त्यामुळे वायभासे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला टाळाटाळ केल्यामुळे वायभासे यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल एम. एल. गाजरे करत आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad