728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

ग्रॅण्डमास्टर चेस स्पर्धेेत पुण्याचा चिन्मय विजयी

अहमदनगर । DNA Live24 - शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रॅण्डमास्टर शार्दुल गागरे रॅपिड चेस टुर्नामेंटमध्ये पुण्याचा चिन्मय कुलकर्णी अंतिम विजेता ठरला. बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया व ग्रॅण्डमास्टर शार्दुल गागरे यांच्या हस्ते विजयी खेळाडूस ३१ हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यावेळी सचिव यशवंत बापट, सुबोध ठोंबरे, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, श्याम कांबळे, डॉ. अण्णासाहेब गागरे, पारुनाथ ढोकळे, संजय जोशी, प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, संजय पांढरकर,श्रीकांत वाखारे, देवेंद्र वैद्य, शुभदा ठोंबरे डॉ. स्मिता वाघ, अनुराधा बापट उपस्थित होते. ओम गार्डन येथे झालेल्या दोन दिवसीय बुध्दीबळ स्पर्धेत २६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत नगरसह , मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, अंबेजोगाई, रायगड जिल्ह्यातील खेळाडूसहभागी झाले होते.

या स्पर्धेत १६०१ च्या वर रेटिंग गटात द्वितीय बक्षीस मोहंमद नुबेर शेख २१ हजार रु. स्मृतीचिन्ह, तृतीय निखील दिक्षीत ११ हजार रु. स्मृतीचिन्ह, चतुर्थ शशीकांत कुतवळ ७ हजार रु. व पाचवा क्रमांक विजेते चंद्रशेखर गोखले यांना ५ रु. चे बक्षिस देण्यात आले. तसेच १६०० च्या खालच्या खेळाडूमध्ये प्रथम क्रमांक अनिल प्रसाद, द्वितीय रोहीत पाटील, तृतीय गौरव झगडे, चतुर्थ महेंद्रकर इंद्रजीत व पाचवा क्रमांक पटकाविणारा शिव सोहमी यांना पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.

उत्कृष्ट महिला बुध्दीबळपटू प्रचिती चंद्रत्रेय, शाल्मली गागरे, संस्कृती वानखेडे यांना तर नगरचे उत्कृष्ट बुध्दीबळपटू विशाल गुजराथी, सुयोग वाघ, सत्यम वरुडे यांना पारितोषिके देण्यात आली.प्रास्ताविकात यशवंत बापट यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. नवोदित खेळाडूंसाठी विविध स्पर्धा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती दिली. ग्रॅण्डमास्टर शार्दुल गागरे यांनी त्यांच्या नावाने स्पर्धा भरविल्याबद्दल जिल्हा बुध्दीबळ संघटना व शांतीकुमार फिरोदिया फाऊंडेशनचे ऋण व्यक्त केले.

अभिमान वाटावा अशी स्पर्धा जिल्ह्यात होत असताना, राज्यात अधिकाधिक जीएम व आयएम घडण्यासाठी स्वत: प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र फिरोदिया म्हणाले, उत्कृष्ट बुध्दीबळपटू घडविण्यासाठी राज्यात प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जाईल. खेळाडूंसाठी तज्ञ ग्रॅण्डमास्टर बोलवून मार्गदर्शन शिबीर घेतले जाणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. स्पर्धेत पंच म्हणून प्रविण ठाकरे (जळगाव), रशिद इनामदार (पुणे), अमरीश जोशी (औरंगाबाद) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पारुनाथ ढोकळे यांनी केले. सुबोध ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: ग्रॅण्डमास्टर चेस स्पर्धेेत पुण्याचा चिन्मय विजयी Rating: 5 Reviewed By: DNA Live24