728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'नागराज'च्या सिनेमात झळकणार 'बच्चन'

मनोरंजन । DNA Live24 - मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, बॉलीवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन हा नागराजच्या  आगामी हिंदी सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार असल्याची माहिती विश्सूवसनीय सूत्रांनी दिली आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा वेगळा ठसा उम‍टविल्यानंतर नागराज मंजुळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. नागराज मंजुळे अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची निर्मिती करण जोहर करणार आहेत. अद्याप चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आलेले नसून कथेवर काम करण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ट्विटर अकाउंटवरून मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचे मोठ्या मनाने कौतुक केले होते. सैराट या चि‍त्रपटाला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचे सर्व विक्रम सैराटने मोडीत काढले आहेत. तत्पूर्वी नागराजच्या फँड्री या सिनेमानेही मराठी सिनेरसिकांच्या मनावर गारुड केले होते. त्यामुळे अल्पावधीतच नागराजचे नाव प्रथितयश दिग्दर्शकांमध्ये घेतले जाऊ लागले. नागराजच्या सैराटची दाक्षिणात्य आवृत्तीही निघणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आता बिग बी अन् नागराज यांच्या एकत्र काम करण्याच्या वृत्तामुळे रसिकांना आतापासूनच उत्सुकता लागून आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'नागराज'च्या सिनेमात झळकणार 'बच्चन' Rating: 5 Reviewed By: DNA Live24