Header Ads

 • Breaking News

  नगर जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मतदारांचा कौल

  अहमदनगर । DNA Live24 - अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नगरच्या मतदारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीला कौल दिला आहे. सर्वाधिक जागा या दोन पक्षांनी मिळविल्या.

  भारतीय जनता पक्षाने ठेवलेल्या ४० प्लस च्या मिशनला जिल्ह्यात सुरुंग लागला. फोर्टी प्लस ठरवलेला भाजप फोर्टीन प्लस (१४) पर्यंतही मजल मारू शकला नाही. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.

  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचा काशिनाथ दाते यांनी पराभव केला. तर भाजप विरोधात उतरलेल्या महाआघाडीने नगर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्वच्यासर्व जागा जिंकून आ. शिवाजी कर्डिले यांच्या गडाला सुरुंग लावला.

  ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडल्ण्याचे धाडस दाखविलेल्या माजी खा. यशवंतराव गडाख यांनी नेवाशात ७ पैकी ५ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजप व राष्ट्रवादीला नेवाशात अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६ पैकी ३ जागावर उमेदवार निवडणून आणले. राष्ट्रवादी २ तर कॉंग्रेस एक जागेवर निवडून आले.

  जामखेडला खर्डा व जावला दोन्ही गत आपल्याकडे राखण्यात पालकमंत्र्यांना यश मिळाले. नगर तालुक्यात महाआघाडीत शिवसेना ३, कॉंग्रेस २ तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. पाथर्डीत ३ सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. शेव्गवत राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला जोराची धडक देत जनविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा काकडे विजयी झाल्या. चारपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या.

  राहुरीत विखे गटाच्या चार कॉंग्रेस उमेदवारांचे भाग्य उजळले. राष्ट्रवादीला २ जागा प्राप्त झाल्या. श्रीरामपुरात कॉंग्रेसच्या ससाणे गटाच्या विरोधात एकवटलेल्या महाआघाडीला ४ पैकी फक्त एक जागा मिळाली. राहात्यात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने सर्वच्यासर्व ५ जागा कॉंग्रेसला मिळाल्या. संगमनेरात थोरात गटाचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. अकोल्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपने खिंडार पाडले. सहापैकी तीन जागांवर भाजप तर, दोन जागा राष्ट्रवादी व एक जागा शिवसेनेला मिळाली.

  तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे -

  नेवासा - 
  क्रांतिकारी शेतकरी पक्ष -5, राष्ट्रवादी -1, भाजप -1.

  श्रीगोंदा - 
  भाजप -3, राष्ट्रवादी -2, काँग्रेस -1.

  कर्जत - 
  भाजप 2, राष्ट्रवादी-2.

  जामखेड - 
  भाजप - 2.

  पारनेर - 
  भाजप 0, राष्ट्रवादी - 1, काँग्रेस - 1, भाकप -1, शिवसेना -2.

  नगर - 
  शिवसेना -3, काँग्रेस -2, राष्ट्रवादी -1.

  पाथर्डी - 
  भाजप -3, शिवसेना -1, राष्ट्रवादी -1.

  शेवगाव - 
  राष्ट्रवादी - 3, जन विकास आघाडी -1.

  राहुरी - 
  काँग्रेस -4, राष्ट्रवादी -2.

  श्रीरामपूर - 
  काँग्रेस -3, महाआघाडी -1.

  राहाता - 
  काँग्रेस -5.

  संगमनेर - 
  काँग्रेस -9.

  अकोले - 
  भाजप -3, राष्ट्रवादी -2, शिवसेना -1.

  कोपरगाव - 
  राष्ट्रवादी -3, काँग्रेस -1.

  ------------
  एकूण - 

  भाजप - 13.

  राष्ट्रवादी -18.

  काँग्रेस -2३

  अपक्ष - 1.

  भाकप -1

  जन विकास आघाडी - 1.

  शिवसेना - 7.

  क्रांतिकारी शेतकरी पक्ष (गडाख) -5.

  एकूण जागा -७३, (एका जागेवर निवडणूक नाही. न्यायालयाची स्थगिती असल्याने कोपरगावच्या चांदेकसारे गटात निवडणूक नाही)

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad