728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

दास्तान-ए-अहमदनगरने जागवला ५२५ वर्षांचा इतिहासअहमदनगर । DNA Live24 - अहमदनगर महाविद्यालयात आयोजित दास्तान-ए-अहमदनगर कार्यक्रमात सहभागी संगणक विभागातील विद्यार्थ्यांनी रंगभूमी व नाट्यभूमीचा अनुभव नसतानाही सादर केलेला इतिहास व इतिहासकालीन वेशभूषा, कला, गझल, लावणी, नाट्य, पोवाडा, ब्रिटीशकालीन नृत्य, मूकनाट्य उपस्थितांची मने जिंकून गेली.


नगरच्या इतिहासाची वाटचाल निजामशाही, मुगलशाही,पेशवाई, मराठेशाही छत्रपतींचा शिवाजी महाराज काळ, ब्रिटीश राजवट व स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्य काळातील महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल याचा सुरेख संगम विध्यार्थ्यांनी त्या त्या काळातील पारंपारिक वेशभूषा व त्या काळातील कला व प्रसंगातून सादर केला.  भव्य किल्ल्याचे प्रवेशद्वार, महाल व तोफांनी सजवलेले भव्य स्टेज, पुरातन काळातील कारंजे व त्या काळातील सजावट केलेला मंडप यामुळे पालकही भारावून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भा. पा. हिवाळे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, आयएमएसचे डॉ. एम. बी. मेहता, सीएसआरडीचे सुरेश पठारे, उपप्राचार्य  प्रा. एन. आर. सोमवंशी, डॉ. एस बी. अय्यर, डॉ. सायमन बार्नबस, स्वाती बार्नबस, डॉ. डी. बी. मोरे, संगणक विभाग प्रमुख प्रा. सय्यद रज्जाक, प्रा. विनीत गायकवाड, फुगनार उपस्थित होते.

मुगल काळातील महत्व शेरोशायरी, गझलांचे महत्व विध्यार्थ्यांनी सादर केले. निजाम काळाची माहिती देताना त्या काळाला अनुसरून असलेला सरताज प्राचार्य डॉ. बार्नबस यांना डॉ. रज्जाक सर यांनी घातला. त्यानंतर शिवशाहीचा काळ दर्शविताना भगवा फेटा घालून तर इंग्रज राजवट प्रसंगी हॅट घालून व स्वातंत्र्याचा काळ दाखविताना गांधी टोपी घालून प्राचार्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व विध्यार्थी यांनी अतिशय परिश्रम घेतले.

परंपरा व संस्कृती जोपासणारे व नाविन्यपूर्ण ज्ञान देणारे असे कार्यक्रम संगणक विभागाने सतत आयोजित करण्याची इच्छा उपस्थित विध्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली. यावेळी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,आय. टी. प्रोफेशनल,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,माजी विध्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा ओसवालने केले तर आभार रिनी पांडियनने मानले.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: दास्तान-ए-अहमदनगरने जागवला ५२५ वर्षांचा इतिहास Rating: 5 Reviewed By: DNA Live24