Header Ads

 • Breaking News

  नगर तालुक्यात दहशतीचे राजकारण अन् नात्यागोत्यांची सेटिंग - सुजय विखे

  अहमदनगर । DNA Live24 - तालुक्यात दहशतीच्या राजकारणाने नात्या गोत्याची सेटींग चालू आहे. या दहशतीचा बिमोड करण्यासाठी व जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काँग्रेस शिवसेनेची आघाडी झाली आहे. निंबळक गटात कोट्यावधीचे कामे झाल्याची बतावणी करणाऱ्यांनी काही लाखांची कामे निदर्शनास आणून द्यावी. समाजकार्य करण्याच्या भावनेने आघाडीचे उमेदवार पुढे आले आहे. एका रात्रीतून निवडणुकित बदल घडत असतो. पाच वर्षाचा लोटलेला अंधकार दूर करण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन डॉ. सुजय विखे यांनी केले.

  काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या निंबळक गटाचे उमेदवार अरुण होळकर, चास गणाचे रामदास भोर व निंबळक गणाचे डॉ. दिलीप पवार यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील निंबळक येथे आयोजित जाहिर सभेत डॉ. विखे बोलत होते. यावेळी उमेदवारांसह माजी खासदार दादापाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आबा सोनवणे, संभाजी लोंढे, राजू रोहोकले, दादाभाऊ होळकर,संजय गिरवले, संपत म्हस्के, राजू कोतकर, अविनाश कोतकर, भाऊराव गायकवाड, रामदास फुले, रावी शिंदे, बाळासाहेब कोतकर, भाऊसाहेब जराड आदिंसह गटातील ग्रामस्थ व कार्यकर्ते सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी विखे म्हणाले, शिवसेनेचा आधार पहिल्यांदाच काँग्रेसला मिळाला नसून, जिल्हा परिषद अध्यक्षपदी शालिनी विखे विराजमान होताना शिवसेनेचा मोठा वाटा होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंनी स्व. बाळासाहेब विखेंना खऱ्या अर्थाने न्याय दिला. सेनेने पहिल्यांदा मंत्रीपद स्व. विखे यांना दिले हे न विसरता येणारे आहे. भविष्यात निवडणुक लढविताना कोणत्याही पक्षाच्या वतीने लढवणार नसल्याचे त्यांनी सुचित केले. पक्षाच्या पलीकडे जावून सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी आघाडी झाली आहे.

  नगर तालुका दहशतमुक्त करुन, जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाचा उमेदवारच अध्यक्ष होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार अरुण होळकर म्हणाले की,स्वत:ला उद्योगपती म्हणवून घेणाऱ्यांनी किती कारखाने एमआयडीसी मध्ये आणले व किती कार्यकर्त्यांना रोजगार मिळवून दिला? गोर गरीब जनतेला फसविण्याचे काम केल्याचे विरोधकांना त्यांनी टोला लगावला. सभेला ग्रामस्थांची उपस्थिती व मतदारांचा कौल लक्षात येत असल्याने त्यांच्या पायाखालची माती सरकली आहे.

  शशिकांत गाडे म्हणाले, भाषण व आश्‍वासनाच्या जोरावर केंद्रात व राज्यात भाजप सरकार असतित्वात आले. बैल घास खाता है... तो दूध भी देगा! या उपरोधक भाषणांनी त्यांनी पतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली. तसेच अनेक भाजप सरकारच्या नेत्यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग ऐकवून ते शेतकरी विरोधी असल्याची पोल खोल केली. आमदार कर्डिले यांनी सादर केलेल्या शिक्षणाच्या खोट्या पदविका व दमदाटी करुन पवन चक्क्यांसाठी शेतक ऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप त्यांनी केला.

  काही वर्षातच कोट्यावधीचा माया जमवणा ऱ्यांनी त्याचा खुलासा करण्याचे आवाहन गाडे यांनी केले. दादा पाटील शेळके यांनी सत्ताधारी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समाचार घेतला व दहशतमुक्त नगर तालुका करण्याची हाक देवून, आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad