Header Ads

 • Breaking News

  चंद्रमा पतसंस्थेच्या १३ संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

  अहमदनगर । DNA Live24 - पाईपलाईन रोडवरील चंद्रमा नागरी पतसंस्थेचे संचालक गोत्यात आले आहेत. एका ठेवीदाराच्या खात्यातील पैशांचा परस्पर अपहार करुन त्याची फसवणूक केल्याप्रकरणी १३ संचालकांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदाराने जिल्हा
  न्यायालयाने दरवाजे ठोठावल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी याप्रकरणी आर्थिक अपहार व फसवणुकीचा गुन्हा नोंदवला अाहे. दीड लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

  याप्रकरणी अनिल दत्तात्रय सानप (३३, रा. गुलमोहोर रोड, नगर) यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दिलेली आहे. सानप यांनी आॅगस्ट २०११ मध्ये चंद्रमा पतसंस्थेत १ लाख ३५ हजार ६०८ रुपयांची मुदतठेव ठेवलेली होती. काही दिवसांनी ते मुदतठेव काढण्यासाठी पतसंस्थेत गेले. पण, त्यांना ठेवीचे व त्यांच्या खात्यातील पैसे (सुमारे दीड लाख रुपये) दिले नाही. चकरा मारुनही त्यांना पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तोफखान्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजित चिंतले या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

  हे आहेत आरोपी - चंद्रभान कुशाबा डफळ, उमेश चंद्रकांत रेखे, संदीप सूर्यभान गिते, चंद्रकांत दत्तात्रय देशमुख, श्रीकृष्ण नामदेव नवले, सुधाकर भागुजी कल्हापुरे, सचिन चंद्रभान डफळ, प्रदीप पांडुरंग पंडित, गणेश विनायक बुऱ्हाडे, लहू सयाजी घंगाळे, विजया चंद्रकांत रेखे, डॉ. सुजाता आसाराम साळवे, अंजली अजित महाजन, अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण चंद्रमा नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad