Header Ads

 • Breaking News

  शेवगावात चोरलेल्या शेळ्या गवसल्या सुप्यात

  शेवगाव । DNA Live24 - तालुक्यातील सुलतानपूर येथील दहा लोकांच्या ७० हजार रुपये किंमतीच्या २१ शेळ्या काही आठवड्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. मात्र चोरीच्या शेळ्या घेऊन जाणार्‍या वाहनाला पुणे रस्त्यावरील सुपा येथे झालेल्या अपघातामुळे यातील काही शेळ्या सापडल्या आहेत. मात्र हे चोरटे अपघातानंतर पळून गेले आहेत.

  याबाबत संदीप जालिंदर लोखंडे (रा.-सुलतानपूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घरासमोरील ३ शेळ्या चोरीला गेल्याचे दुसर्‍या दिवशी उघड झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र शेळ्या सापडल्या नाहीत. मात्र वर्तमानपत्रात वाचलेल्या जीप क्रमांक एम. एच. ११, ए. डब्ल्यू. २९२९ ला सुप्याजवळ अपघात झाल्याची व त्यामध्ये शेळ्या असल्याच्या बातमीवरून बोरुडे यांनी थेट सुपा गाठले. तेथील पोलीस ठाण्यात जाऊन शेळ्या पाहिल्या.

  तेथे त्यांच्या मालकीच्या तीन शेळ्या त्यांनी ओळखल्या. त्यांनी पुन्हा शेवगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. तसेच गावातील आणखी काही लोकांच्या शेळ्या चोरीला गेल्या असल्याच्या माहितीवरून त्यांनी ती माहिती फिर्यादीत दिली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करत आहेत.

  Post Top Ad

  Post Bottom Ad