728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

भारताचा बांगलादेशवर २०८ धावांनी 'विराट' विजय


हैदराबाद । DNA Live24 - भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद येथे झालेला कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर दणदणीत २०८ धावांनी विजय मिळवला. या मालिका विजयासह विराट सेनेची विजय पताका रोवली आहे. हैदराबाद कसोटी जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या पाचव्या दिवशी ७ विकेटची गरज होती. भारताने या ७ विकेट दोन सत्रातच बांगलाचा दुसरा डाव २५० धावांत गुंडाळला. अन् चहापानापूर्वी विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताना मोठा विजय मिळाला असला, तरीही बांगलादेशने चिवट खेळ केला. बांगलादेशाने दुसऱ्या डावात १०० हून अधिक षटके खेळत भारताची चांगलीच परीक्षा पाहिली. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात महमुदुल्लाहने सर्वाधिक ६४ धावा केल्या. सौम्य सरकारने ४२ धावा केल्या. बांगलाकडून कोणीही मोठी खेळी केली नसली तरी बांगलाने दुस-या डावात अडीचशे धावा केल्या हे विशेष. भारताकडून रविंद्र जडेजा व अश्विनने प्रत्येकी ४-४ विकेट घेतल्या. इशांत शर्माने दोन विकेट मिळवल्या.

विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला. आज सकाळी रविंद्र जडेजाने शाकिब अल हसनला २२ धावांवर टिपले. तर आर अश्विनने कर्णधार मुशफिकूर रहीमला २३ धावांवर बाद केले. त्यानंतर इशांत शर्माने शब्बीर रेहमानला २२ धावांवर बाद केले. तर महमुदल्लाहला ६४ धावांवर बाद केले. मेहंदी हसन २३ धावांवर बाद झाला. त्याला जडेजाने साहाद्वारे झेलबाद केले. शब्बीर रेहमानने चिवट फलंदाजी करत ६१ चेंडू खेळत २२ धावा केल्या. तैजूल इस्लामला ६ धावांवर जडेजाने बाद केले.

तक्सीन अहमदला १ धावेवर अश्विनने पायचित केले. कामरूल इस्लामने चिवट फलंदाजी करत ७० चेंडू खेळून काढले. तो ३ धावांवर नाबाद राहिला. आर. अश्विनने या सामन्यातज तब्बल ३६ वर्षे जुना विक्रम मोडला. ऑफस्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटीत सर्वाधिक वेगाने २५० बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने ३६ वर्षे जुना विक्रम मोडला. अश्विनची कामगिरी आणि चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ५४ धावांच्या खेळीच्या बळावर बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटीत चौथ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. 

भारताने बांगलादेशला पहिल्या डावात ३८८ धावांवर रोखले. त्यानंतर फॉलोऑन न देता भारताने दुसऱ्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने दुसऱ्या डावात २९ षटकांत ४ बाद १५९ धावा काढून डाव घोषित केला.  पहिल्या डावातील २९९ धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ४५९ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत बांगलादेशने १०३ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या डावात शतक ठोकणारा मुरली विजय अवघ्या ७ धावा काढून बाद झाला. तर लोकेश राहुल १० धावा काढून परतला.

यानंतर विराट कोहलीने (३८) आणि पुजाराने (नाबाद ५४) भारताचा डाव सावरला. २८ धावा काढणाऱ्या अजिंक्य रहाणेला सकिबने बाद केले. भारताने चहापानाच्या ब्रेकला ४ बाद १५९ धावांवर दुसरा डाव घोषीत केला. भारताने ४५९ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात अश्विनने कुंबळेला १० कसोटींनी मागे टाकले. अश्विनच्या आधी सर्वात वेगवान २५० बळी घेण्याचा भारतीय विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने ही कामगिरी ५५ कसोटींत पूर्ण केली होती.  अश्विनने १० कसोटीने कुंबळेला मागे टाकले. बिशनसिंग बेदीने ६०, हरभजनसिंगने ६१, कपिलदेवने ६५ आणि जहीर खानने ७३ कसोटींत २५० बळी पूर्ण केले.

४५ व्या कसोटीत खेळणाऱ्या अश्विनने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात मुशाफिकूर रहीमला बाद करताच कसोटीत आपल्या २५० विकेट पूर्ण केल्या. यासह त्याने सर्वांत कमी कसोटीत २५० विकेट घेण्याचा विश्वविक्रम नावे केला. अश्विनच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीच्या नावे होता. लिलीने ३६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये भारताविरुद्ध मेलबर्न कसोटीत ८ विकेट घेऊन (दोन्ही डावांत ४ विकेट) ही कामगिरी केली. लिलीने ४८ कसोटींत २५० बळी घेतले होते. दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने ४९ कसेाटींत २५० बळी घेतले. तो या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. पदार्पणापासून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

अश्विनने २०११ मध्ये कसोटीत पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. श्रीलंकेचा रंगना हेराथ (४६ कसोटींत २४७ बळी) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादरम्यान दुसरा कोणताच भारतीय गोलंदाज अश्विनच्या निम्म्यासुद्धा विकेट घेऊ शकला नाही. दरम्यान, जडेजाने २६ कसोटींत ११४ बळी घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: भारताचा बांगलादेशवर २०८ धावांनी 'विराट' विजय Rating: 5 Reviewed By: DNA Live24