Header Ads

 • Breaking News

  पारनेरकरांनी उमटवलाय विविध क्षेत्रांत ठसा - आवारी


  पारनेर । DNA Live24 -  पारनेर तालुक्याचे पाणी इतर गावांपेक्षा निश्चितच वेगळे आहे. मात्र तरीही ते अतिशशुद्ध आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा वेगवेगळ्या क्षेत्रात पारनेरकरांनी आपला ठसा उमटवला आहे. आपणही चांगला अभ्यास करून मोठ्या पदावर काम करा. मात्र, आई-वडिलांची सेवा करा वडिलधाऱ्यांचा आदर राखा, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (माध्यमिक) उत्तमराव आवारी यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या अळकुटी येथील श्री साईनाथ हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते.

  श्री साईनाथ हायस्कूलचे उपप्राचार्य बी. पी. आढाव उपशिक्षक एस. आर. थोरात यांचा सेवापूर्ती सोहळा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयतचे जनरल बॉडी सदस्य ॲड. शंकरराव माने होते. यावेळी रयतचे उत्तर विभागाचे सहायक निरीक्षक एस. पी. ठुबे, सरपंच बाबाजी भंडारी, बाळकृष्ण परंडवाल, कान्हूरच्या सरपंच संगीता सोनावळे, बाळासाहेब पुंडे, संतोष काटे, सुभाष आढाव, सखाराम आढाव, किसनराव रासकर, नामदेव घोलप, बी. व्ही. पवार, अप्पासाहेब ठुबे आदी उपस्थित होते.

  यावेळी आवारी म्हणाले, आज सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांनी प्रामाणिक सेवा केली. विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवल्यास यशाची शिखरे गाठता येतील. या वेळी विभागीय अधिकारी ठुबे म्हणाले, अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी मिळणाऱ्या संधीचे सोने करून व्यक्तिमत्त्व विकास साधावा. संस्था सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते. १० १२ वीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

  मागील वर्षी विविध स्पर्धा परीक्षा शालेय परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिक्षणप्रेमींनी ठेवलेल्या रोख पारितोषिकांनी गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संपतराव काळे केले. तसेच आढावा घेतला. सूत्रसंचालन गोरक्ष शिंदे, तर आभार सोन्याबापू शिंदेंनी मानले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad