Header Ads

 • Breaking News

  श्रमिकनगरला रविवारी हीलिंग हार्मनी संगीत मैफिल

  अहमदनगर । DNA Live24 - पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री मार्कंडेय विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने रविवारी (२६ जानेवारी) सायंकाळी ६ वाजता हीलिंग हार्मनी या अभुतपूर्व संगीत मैफिलचे आयोजन करण्यात आले आहे. मार्कंडेय विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या मैफिलीत सुप्रसिध्द गीतगायक डॉ. शेखर कुलकर्णी यांचे बहारदार गायनाचा कार्यक्रम रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.

  मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येला या मैफिलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, संस्थेचे अध्यक्ष शरद क्यादर, उपाध्यक्ष रमेश सब्बन, सचिव विलास पेद्राम आदिंसह संस्थेचे सर्व विश्‍वस्त व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad