Header Ads

 • Breaking News

  तरुणांनी माेठ्या प्रमाणावर शेतीकडे वळायला हवे - कवी दौंडकर

  अहमदनगर । DNA Live24 - शेतकऱ्यांच्या जीवनात विदारक वास्तव असले, तरीही पोटाची भूक शेतकरीच भागवू शकतो. म्हणून तरुणांनी मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्धी कवी भरत दौंडकर यांनी केले. लाल टाकी रोडवरील न्यू आर्टस् कॉलेजमध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दौंडकर बोलत होते. 

  कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. मराठी विभागातील विद्यार्थीनी मानसी येठेकर हिने नृत्याद्वारे महाराष्ट्राची संस्कृती सादर केली. त्यानंतर ओवी, वेचे, भारुड, अभंग, लावणी यावर आधारित ‘मराठी गौरव’ हा कार्यक्रम अर्चना गायकवाड, उर्मिला फुटाणे, आरती भगत, शितल पाखरे, पूजा पांडूळे, मयुरी लसगरे आदी विद्यार्थींनींनी सादर केला.

  माता, माती आणि संस्कृती या विषयाच्या अंगाने गोफ, घुंगरु, बाप अशा अनेक कवितांचे सादरीरकण दौंडकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर झावरे होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य आर. जी. कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुनिता भांगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले. तर आभार डॉ. नवनाथ येठेकर यांनी मानले.

  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीना कोहोक, डॉ. महेबुब सय्यद यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. किसन अंबाडे, प्रा. बाळासाहेब वाईकर, डॉ. पी. टी. शेळके, डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. बाळासाहेब पवार, प्रा. भरत होळकर, डॉ. नागेश शेळके, प्रा. मदन काशिद, डॉ. श्रद्धा इंगळे, प्रा. संगीता निंबाळकर, डॉ. मीना साळे, प्रा. नयना कडाळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad