Header Ads

 • Breaking News

  नेवासा तालुक्यात ७३.५७ टक्के मतदान

  नेवासे । DNA Live24 - तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांसाठी गुरूवारी काल शांततेत ७३.५७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण २ लाख २४ हजार ९०५ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ४७७ मतदारांनी मतदान केले. १ लाख १९ हजार ४४५ पुरुष मतदारांपैकी ८९ हजार ८७८ पुरुषांनी तर १ लाख ५ हजार ४६० स्त्री मतदारांपैकी ७४ हजार ६३० मतदारांनी अशा एकूण २ लाख २४ हजार ९०५ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ४७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

  मतदानाचे हे प्रमाण 73.57 टक्के इतके आहे. सर्वत्र शांततेत मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक ठिकाणी मतदान सुरू होते. बेलपिंपळगाव गटात 71.18 टक्के, कुकाणा गटात 72.18 टक्के, भेंडा येथे 75.61 टक्के, भानसहिवरा गटात 69.46 टक्के, खरवंडी येथे 75.58 टक्के, सोनई येथे 73.88 तर चांदा गटात 72.46 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

  पाचेगाव येथे 3809 पैकी 2520 मतदारांनी मतदान केले. पुनतगाव येथे 1529 पैकी 1270 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सलाबतपूर गणातील सलाबतपूर येथे 2950 पैकी 2156 (73.8 टक्के) मतदारांनी मतदान केलले. याच गणातील गिडेगाव येथे 999 पैकी 750 (75 टक्के) मतदान झाले. संवेदनशिल असलेल्या गळनिंब येथे 1463 पैकी 1246 (85 टक्के) मतदारांनी मतदान केले. गोगलगाव येथे 1440 पैकी 1152 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

  चांदा गटातील देडगाव येथे 4 हजार 126 मतदारांपैकी 2940 (71.25 टक्के) मतदारांनी मतदान केले. माळीचिंचोरा येथे 3710 पैकी 2449 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जळके येथे रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. येथे 1302 पैकी 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देवगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत 3210 पैकी 2542 मतदारांनी आपला हक्क बजावला.एकूण मतदारांपैकी 150 मतदार मयत आहेत. मतदारांच्या मोठ़्या प्रमाणात रांगा लागल्यामुळे मतदान सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होते. यामध्ये 1444 पुरुषांनी तर 1098 महिलांनी हक्क बजावला.

  बुथ क्रमांक 32/11 मध्ये 1209 पैकी 957 मतदारांनी हक्क बजावला तसेच बुथ क्रमांक 32/12 मध्ये 973 पैकी 779 मतदारांनी हक्क बजावला तर बुथ क्रमांक32/13 मध्ये 1028 मतदाना पैकी 806 मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळपासूनच मतदाराच्या रांगा लागल्या होत्या. मतदार उत्साहामध्ये मतदानाचा हक्क बजावत होते. आमदार बाळासाहेब मूरकुुटे यांनी सकाळी आठ वाजता मतदानाचा हक्क बजावला. पंमपरेनुसार सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व राजकीय विरोधकांनी एकत्र चहा पिऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

  सोनई जिल्हा परिषदेच्या घोडेगाव गणात 16 हजार 508 पैकी 12 हजार 144 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचे हे प्रमाण 73.56 टक्के इतके आहे. घोडेगाव येथे 6872 पैकी 4689  (68.23 टक्के), झापवाडी येथे 1273 पैकी 964( 75.72 टक्के), लोहगाव येथे 2412 पैकी 1853( 76.82 टक्के), मोरेचिंचोरे येथे 1656 पैकी 1212 (73.36 टक्के), पानसवाडी येथे 1277 पैकी 937(73.37 टक्के), धनगरवाडी येथे 1316 पैकी 1123 (85.33 टक्के), वंजारवाडी 1702 पैकी 1366 (80.29 टक्के) अशाप्रकारे एकूण 16 हजार 508 पैकी 12 हजार 144 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचे हे प्रमाण जवळपास 74 टक्के (73.56 टक्के) आहे. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. मतदान शांततेत पार पडले.

  चांदा येथे 7 हजार 802 मतदारांपैकी 3 हजार 202 पुरुष व 2हजार 332 स्त्रिया अशा एकूण 5 हजार 6660 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचे हे प्रमाण 72.54 टक्के इतके आहे. बुथ क्र. 224 मध्ये 1085 पैकी 766, 225 मध्ये 1162 पैकी 896, बुथ क्र. 226 मध्ये 1121 पैकी 796, 227 मध्ये 1246 पैकी 864, बुथ 228 मध्ये 1134 पैकी 818, बुथ 229 मध्ये 857 पैकी 605, बुथ 230 मध्ये 1197 पैकी 915 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सात वाजेपर्यंत मतदान झाले. फत्तेपूर येथे 71 टक्के मतदान झाले.

  भानसहिवरा येथे 5590 पैकी 3806 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचे हे प्रमाण 68.08 टक्के इतके आहे. केंद्र क्र.85 मध्ये 1219 पैकी 785 (64.39 टक्के), केंद्र क्र. 86 मध्ये 1040 पैकी 674 (64.90 टक्के), केंद्र क्र.87 मध्ये 1233 पैकी 862 (69.91 टक्के), केंद्र क्र. 88 मध्ये 1185 पैकी 863(72.82 टक्के) तर केंद्र क्र. 89 मध्ये 913 पैकी 622 (68.12 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

  Post Top Ad

  Post Bottom Ad