Header Ads

 • Breaking News

  नेवाशातील त्रिवेणीश्वरला महाशिवरात्री उत्सव सुरू

  नेवासे । DNA Live24 - तालुक्यातील हंडीनिमगाव येथील श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर येथे पंचदिनात्मक महाशिवरात्री उत्सवास मंगळवारपासून संत महंतांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. सकाळीच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

  सकाळी निघालेल्या शोभायात्रेतील रथामध्ये पंजाब येथील भूपेंद्रगिरी महाराज, कोल्हापूर येथील आनंदसिद्ध महाराज, सुनीलगिरी महाराज, दिगंबरबाबा आराध्ये, गोपालगिरी महाराज, पवनपुत्र आश्रमाचे महंत बजरंग महाराज, कडूभाऊ काटे महाराज, जनार्दन मेटे महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे लेझिम झांजपथक सहभागी होते. महंत भूपेंद्रगिरी महाराज, आनंदसिध्द महाराज, शिवाजी महाराज देशमुख, बजरंग महाराज, गोपालगिरी महाराज, सुनीलगिरी महाराज, दिगंबरबाबा आराध्ये यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. मिरवणुकीचे तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.

  दुपारी त्रिवेणीश्वर येथील पवित्र शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. त्याचे पौरोहित्य आचार्य प्रकाश मुळे यांनी केले. संत-महंतांचे औक्षण करून संत पूजन, कलश पूजन करण्यात आले. माजी आमदार पांडुरंग अभंग, शंकरराव गडाख, विठ्ठल लंघे, हंडीनिमगावचे सरपंच भिवाजी आघाव, पांडुरंग उभेदळ, सुनील वाघ, देविदास साळुंके, बाळासाहेब साळुंके, बाळासाहेब भदगले, कल्याण पिसाळ, बाळासाहेब बनकर, अरुण देऊळगावकर, तुकाराम शेंडे, प्रा. लक्ष्मण माळी, बापूराव बहिरट, अण्णासाहेब जावळे, निवृत्ती काळे, जनार्दन पटारे, किशोर जोजार, रावसाहेब कांगुणे आदींसह भाविक यावेळी उपस्थित होते. तर डॉ. रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad