Header Ads

 • Breaking News

  घरकुल वंचित मागणार सरकारी योजनांचा प्रगती अहवाल

  अहमदनगर । DNA Live24 - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित घरकुल वंचित लोकशाही दिनात जिल्हा परिषद, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात जावून, जाहिर करण्यात आलेल्या सरकारी योजनांचा प्रगती अहवाल मागणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. लोकशाही दिनाचे न्यायदिनात रुपांतर करुन, योजना कशा पध्दतीने कार्यान्वीत झाली त्याची पडताळणी केली जाणार आहे.

  पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरातील घरकुल वंचितांची शहानिशा लवकरच होणार असल्याने घरकुल वंचितांनी आवश्यक कागदपत्र तयार ठेवून, उत्पन्नाचा दाखला काढण्याचे आवाहन करण्यात आले. १० मार्चपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मनपाच्या वतीने शहानिशा मोहिम हाती घेतली जाणार आहे. यामध्ये घरकुल वंचितांना सुचित केलेल्या कागदपत्राची पुर्तता करावी लागणार आहे.

  शासन घोषित केलेली योजना राबविण्यास असक्षम असेल तर घरकुल वंचित स्वत:च्या हक्काच्या जागेवर झोपड्या उभारणार आहे. सरकारी योजनांची फक्त घोषणा केली जात असताना महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनात जावून जाहिर झालेल्या योजनांचे प्रगती अहवाल लेखी स्वरुपात मागणार आहे. यामुळे योजना कागदोपत्री न राहता,नागरिकांच्या जागृकतेने त्याची सक्षमपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले.

  यावेळी अ‍ॅड. सुधीर टोकेकर, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, वर्षा लहाने, अंबिका नागुल, बाबा शेख, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे, सखुबाई बोरगे, हसीना अन्सारी, रुक्मणी पोटे, प्रमिला रुमाल, मिराबाई जगदडे, अनिता कासार, शोभा कुंटला, शकुंतला सुरसे, वैशाली नल्ला आदिंसह शहरातील घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Post Top Ad

  Post Bottom Ad