Header Ads

 • Breaking News

  राहाता तालुक्यात विखेंचे वर्चस्व कायम

  राहाता । DNA Live24 - तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणांच्या सर्व जागा जिंकून विखे यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदपंचायत समितीच्या निवडनुकीत राहाता तालुक्यात अपेक्षेप्रमाणे सर्व जागांवर विखे असेच चित्र पुन्हा एकदा निर्माण झाले आहे. 

  पाच जिल्हा परिषद गट दहा पंचायत समिती गणात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या शालिनी विखे यांनी जिल्ह्यात विक्रमी मतांनी विजय होण्याचा मान मिळवला आहे.

  राहाता तालुक्याच्या निर्मितीनंतर आजवरच्या सर्व निवडणुकांत राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेत पंचायत समितीवर आपले वर्चस्व अबाधित राखलेले होते. त्याची पुनरावृत्ती याही वेळेला पुन्हा एकदा झाली आहे.

  असे आहे बलाबल -  (२०१७) - (२०१२)

  राष्ट्रवादी - ०० - ००
  काँग्रेस - १० - १०
  शिवसेना - ०० - ००
  भाजप - ०० - ००
  मनसे - ०० - ००

  पक्ष विजयी उमेदवार मागील जागा  - (२०१७) - (२०१२) 

  राष्ट्रवादी - ०० - ००
  काँग्रेस - ०५ - ०५
  शिवसेना - ०० - ००
  भाजप - ०० - ००
  मनसे - ०० - ००
  पंचायत समिती : एकूण गण १०
  जिल्हा परिषद : एकूण गट ०५

  Post Top Ad

  Post Bottom Ad