Header Ads

 • Breaking News

  संपत पिंपळे यांचे कर्तृत्व ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी

  अहमदनगर । DNA Live24 - व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. ही गोष्ट ग्रामीण विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केला. प्रा. संपत नामदेव पिंपळे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात अाली. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना ते बाेलत होते.

  प्रा. संपत पिंपळे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात एम. एस्सी इलेक्ट्रॉनिक मिडिया विभागाचे समन्वयक आहेत. विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत समारंभात त्यांना 'जनसंपर्क आणि पत्रकारिता' विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांना प्रा. डॉ. दीपक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. पिंपळे यांनी दिग्दर्शन केलेल्या "मुरळी मी देवाची" या  लघुपटाला विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट मोहत्सवांमध्ये विविध पारितोषिके मिळालेली आहेत.

  ग्रामीण भागातून आलेल्या पिंपळे यांनी चाकोरीबाहेरच्या विषयात  स्वतःचे करियर घडवले. आतापर्यंतच्या वाटचालीत पिंपळे यांनी आवर्जून दोन विद्यापीठांचे कुलगुरू राहिलेल्या डॉ. सर्जेराव निमसे व सुलभा निमसे यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले आहेत. आपल्या आजवरच्या प्रवासात कुटुंबीय, मित्र  नेहमी पाठीशी उभे राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगामी काळात दर्जेदार लघुपट, चित्रपटांचे दिग्दर्शन करणार असल्याचे प्रा. पिंपळे यांनी सांगितले आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad