Header Ads

 • Breaking News

  संस्कृती फाऊंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

  अहमदनगर । DNA Live24 - समाजात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप गरजेची आहे. गौरव झाल्यास काम करण्यास अधिक प्रेरणा मिळते. यासाठी काम करणाऱ्यांना पुरस्काररुपी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महिला विविध क्षेत्रात कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवत असताना समाजाकडून त्यांना आत्मसन्माण व पाठबळ मिळणे जरुरीचे आहे, असे मत महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केले.

  संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने तुषार गार्डन येथे आयोजित समाजगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी,प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, माजी महापौर शिला शिंदे, सचिव रेणुका सोनवणे, गोरक्षनाथ सोनवणे, महेश देशपांडे, नगरसेवक दिलीप सातपुते उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे उद्घाटन राजाराम भापकर गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे यांनी केले. राजाराम भापकर गुरुजी म्हणाले, सामाजिक काम करण्यासाठी वेडे होवून काम करावे लागते. काम करताना एकाग्रता, नियमितता व कार्यसिध्दीस नेण्यासाठी स्वत:ला त्या कामात झोकावे लागते. त्यांनी गुंडेगाव परिसरात केलेल्या रस्त्याच्या कामाची माहिती दिली व आई वडिलांची सेवा करण्याचा संदेश दिला.

  विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणारे निलकंठ सोले, शितल साळवी, कमर सुरुर, दिपक मेढे, अंजली देवकर वल्लाकटी, प्रफुल्ल लाटणे, विक्रम भोगाडे, कैलास जाधव व शिला शिंदे यांना समाजगौरव पुरस्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पारुनाथ ढोकळे यांनी केले. उपस्थितांचे आभार रेणूका सोनवणे यांनी मानले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad