728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

गडाख फुंकणार नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग?

अहमदनगर । DNA Live24 -जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत वर्चस्व सिद्ध केलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते माजी आमदार शंकरराव गडाख आभार सभेद्वारे नेवासा नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या मताचे आभार मानण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजता नेवासा ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आभार सभेत माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नेवासा  तालुक्यासह जिल्ह्यातील भल्या भल्या राजकारण्यांचे या सभेकडे लक्ष लागले आहे.

नेवासा ग्रामपंचायतीची नगरपंचायत करण्यास नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरपंचायतीवर पहिला नगराध्यक्ष आपलाच व्हावा, यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहे. नेवासा शहरात आभार सभा घेऊन गडाख कुटुंबाने सध्या तरी यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. नेवासा शहराचा प्रथम नगराध्यक्ष आपल्या बाजूचा करून नेवाशावर एकहाती सत्ता राखण्याचे मोठे आव्हान गडाखांसमोर आहे.

नेवासा शहरात वर्चस्व मिळवण्यासाठी गडाखांना शिवसेना व भाजपचेही मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे जोरदार शक्तीप्रदर्शन करून विरोधकांची हवा गुल करण्याची रणनीती गडाखांनी आखल्याची चर्चा आहे. याशिवाय आभार सभेतील शाब्दिक फटकाऱयांनी गडाख आपल्या विरोधकांवर कसा प्रहार करणार, याबाबतही प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: गडाख फुंकणार नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग? Rating: 5 Reviewed By: DNA Live24