Header Ads

 • Breaking News

  शेवगावचा इनरव्हील क्लब सामाजिक कार्यात अग्रेसर - तारपोरवाला

  शेवगाव । DNA Live24 - शिक्षणापासून वंचित राहणार्‍या मुलांच्या जीवनात ज्ञानाची प्रकाशकिरणे पडून संपूर्ण जीवनच उजळून जावे. स्त्री भ्रूणहत्या बंदीसाठी व महिलांचे आरोग अधिक तंदुरस्त राहण्यासाठी येथील इनरव्हील क्लबची शाखा करीत असलेले काम कौतुकास्पद आहे, असे उद्गार इनरव्हील क्लबच्या पुणे येथील डिस्टिट्रक्ट गवर्नर दिनाझ तारपोरवाला यांनी काढले.

  येथील इनरव्हील क्लबला दिलेल्या भेटीप्रसंगी तारपोरवाला बोलत होत्या. यावेळी इनरव्हील क्लबच्या येथील अध्यक्ष डॉ. मनीषा लढ्ढा, सचिव रूपाली तडवलकर, डॉ. प्रतिभा बेडके, श्रद्धा लाहोटी, वर्षा भोसले, कोमल लांडे व इतर सदस्या उपस्थित होत्या. यावेळी लढ्ढा म्हणाल्या, दिनाझ यांची ही पहिली भेट आपणासाठी संस्मरणीय ठरणार आहे. त्यांनी केलेले मार्गदर्शन आमच्यासाठी उत्तेजनाची मात्रा ठरून आम्ही या वर्षाच्या उर्वरीत काळात नव्या जोमाने व उत्साहाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लबने इ-लर्निंग स्कूल, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, दत्तक घेतलेल्या शाळेला कुंपण आदी कामे सध्या हाती घेतलेली आहेत. तर ७१ सदस्यांच्या सहकार्यातून ५१ प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. यावेळी नागरिकांचीही माेठ्या संख्येने उपस्थिती होती.

  Post Top Ad

  Post Bottom Ad