728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी - भोर

अहमदनगर । DNA Live24 - शिवचरित्र हे आदर्शाचे भांडार आहे. अशा शिवचरित्राचे घरोघरी वाचन झाले पाहिजे. लहान मुलांना शिवविचारांचे बाळकडू मिळाल्यास भावीपिढी संघर्षासाठी तयार होईल. तसेच अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी शिवचरित्रातून तरुणांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन शिवशाहीर मुकुंदा भोर यांनी केले.

शिवप्रहार संघटनेच्या वतीने भिस्तबाग चौकात सुरु असलेल्या शिवजयंती उत्सवाच्या दुसऱ्या दिवसीय  कार्यक्रमात शाहीर भोर बोलत होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करुन उपस्थिताची वाहवा मिळवली. तसेच शिव जन्माचा पोवाड्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.

भोर म्हणाले, राजाचे सवंगडी हे दिलाने सच्चे होते. त्यांच्या साठी राजांचा शब्द जीव की प्राण होता. सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेऊन महाराजांनी आदर्श स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी स्त्रीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा ठोठावल्यानंतर पुन्हा स्त्री अत्याचाराच्या घटना घडल्या नाही. आता मात्र स्त्रीयांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार घडत आहेत.

प्रारंभी अनिता काळे यांनी घराघरात शिवाजी महाराज निर्माण होण्यासाठी मुलांवर जिजाऊंच्या प्रेरणेने संस्कार करण्याचे आवाहन केले. पाहुण्यांचे स्वागत पद्ममा गांगर्डे, आशा साठे, सुशिला गुंजाळ, आशा अनारसे, संगीता भोर, पुजा गांगर्डे आदि महिला पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर, अविनाश गुंजाळ, दिपक शिंदे, राजेंद्र कर्डिले, संदिप संसारे, बाबाजी शिंदे, नितीन ढाळे, शिवा शिंदे, प्रविण गवळी, प्रशांत लवांडे आदिंनी परिश्रम घेतले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी - भोर Rating: 5 Reviewed By: DNA Live24