Header Ads

 • Breaking News

  अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

  अहमदनगर । DNA Live24 - लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. नंतर तिला शहर व उपनगरातील विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारनंतर नगर शहरात घडला. याप्रकरणी मुलीच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन कोतवाली पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपी युवकाला अटकही करण्यात आली आहे.

  योगेश अशोक गायकवाड (२१, रा. अकोळनेर, ता. नगर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याने अल्पवयीन मुलीला तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने पळवून नेले. मोटारसायकलवर बसवून त्याने तिला शहरातील विविध लॉजवर नेले. तेथे तिच्या संमतीशिवाय त्याने तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या आईने तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने युवकाचा शोध घेतला. तो मुलीसह माळीवाडा परिसरातील एका लॉजमध्ये आढळून आला.

  कोतवालीचे पाेलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या पथकाने वेगाने तपास करुन मुलीसह युवकाला पकडले. दोघेही माळीवाडा परिसरातील एका लॉजमध्ये थांबलेले होते. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन युवकाविरुद्ध अपहरण, बलात्कार, बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक राहुलकुमार पाटील हे करीत आहेत. आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad