Header Ads

 • Breaking News

  भुईकोट किल्ल्यात नगरवासियांनी राबविले स्‍वच्‍छता अभियान

  अहमदनगर । DNA Live24 - जिल्‍हाधिकारी अनिल कवडे यांच्‍या प्रेरणेतून ऐतिहासिक भुईकोट किल्‍यात मंगळवारी भल्या सकाळीच अहमदनगरवासियांनी स्‍वच्‍छता अभियान राबविले. जिल्‍ह्यात पर्यटनवाढीच्‍या दृष्टिने हे एक महत्‍त्‍वाचे पाऊलच ठरले आहे. या स्‍वच्‍छता उपक्रमात शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक, स्‍वयंसेवी संस्‍था, सामाजिक कार्यकर्ते, स्‍वच्‍छतादूत, अहमदनगर प्रेस क्‍लब आदींनी उत्‍स्फूर्त सहभाग नोंदवला.

  स्‍वच्‍छता अभियानामध्‍ये लोकांनी स्‍वयंप्रेरणेने सहभागी व्हावे यासाठी नियोजन भवनात पूर्वतयारी बैठक घेण्‍यात आली होती. त्‍यास विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नियोजनानुसार प्रत्‍येक शाळा- महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांची उपक्रमामध्‍ये उपस्थिती लक्षणीय होती. आज सकाळी साडे सहा वाजेपासूनच जत्‍थेच्‍या जत्‍थे येत होते. कोणी दुचाकीवरुन तर कोणी पायी. कोणी खाजगी वाहनातून तर कोणी शासकीय वाहनातून. सर्वांच्‍या मनात एक ऊर्मी होती स्‍वच्‍छतेची.

  शालेय विद्यार्थ्‍यांचा उत्‍साह तर शब्‍दांत वर्णन न करता येण्‍यासारखाच. किल्‍याच्‍या प्रवेशद्वाराजवळ आलेल्‍या पथकाला नियोजनबध्‍द पध्‍दतीने परिसरातील जागा नेमून देण्‍यात आल्‍यात. त्‍यानुसार ते पथक झाडू, टोपले, फावडे घेऊन कचरा साफ करण्‍याच्‍या कामाला लागले. महापालिकेचे ट्रक कचरा नेण्‍यासाठी सज्‍ज होते. जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी, सिनिअर क्‍वार्टर मास्‍टर कर्नल राजवीर सिंग, बीटीआरचे कर्नल गगनसिंग, लेफ्टनंट कर्नल निखील पांढरेकर, नायब सीसलदार गुरुमित सिंग, महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त विलास वालगुडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्‍हाधिकारी दत्‍तात्रेय बोरुडे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, जिल्‍हा सांख्यिकी अधिकारी काळे, जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंढे, जिल्‍हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक चंद्रकांत तांबे, भिंगार छावणी मंडळाचे विनीत लोटे, नितीन कापडणीस, सहायक पोलिस अधीक्षक चिन्‍मय पंडित, गणेश मरकड, सुधीर लांडगे, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, डॉ. सुरेश पठारे, अहमदनगर प्रेस क्‍लबचे अध्‍यक्ष मन्‍सूर शेख, भूषण देशमुख, श्रीराम जोशी, अरुण वाघमोडे,  ज्ञानेश्‍वर कांबळे, प्राचार्य भास्कर झावरे, तहसिलदार सुधीर पाटील, स्‍वच्‍छतादूत सुशांत घोडके, सुरेश खामकर, अंजली देवकर, शारदा होशिंग, स्‍वयंसिध्‍द फौंडेशनच्‍या बेबीताई गायकवाड, संतोष यादव असे अनेक मान्‍यवर स्‍वच्‍छता अभियानामध्‍ये सहभागी झाले होते.  

  सीएसआरडी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्‍टेट बँक ऑफ इंडिया, आठरे पाटील पब्लिक स्‍कूल,  रामकृष्‍ण स्‍कूल, पेमराज गुगळे हायस्‍कूल, डॉन बॉस्‍को, हायस्‍कूल, अहमदनगर बॉईज हायस्‍कूल, देवेंद्रनाथ माध्‍यमिक विद्यालय, गाडीलकर हायस्‍कूल, न्‍यू आर्टस, कॉमर्स एण्‍ड सायन्‍स कॉलेजच्‍या एनएसएस व एनसीसीचे जवान, यशवंत विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, रेणावीकर हायस्‍कूल, राष्‍ट्रीय पाठशाला हायस्‍कूल, चांदसुल्‍तान हायस्‍कूल, लक्ष्‍मीबाई भाऊराव पाटील विद्यालय, पार्वतीबाई डहाणूरकर हायस्‍कूल, राधाबाई काळे महाविद्यालय, सिताराम सारडा विद्यालय, मार्कंडेय विद्यालय, प्रगत विद्यालय, अहमदनगर हायस्‍कूल, नगर कॉलेज, दादासाहेब रुपवते विद्यालय, समर्थ हायस्‍कूल, कारगील अॅकेडमी, पारनेर मित्र मंडळ, केमिस्‍ट मित्र परिवार, नागेबाबा प्रतिष्‍ठान, दिनूभाऊ क्रीडा मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रोटरी क्‍लब, हरियाली संस्‍था, जिल्‍हा पुरोहित मंडळ, सकल जैन श्रावक संघ आदींसह इतर अनेक सामाजिक संघटनांचे सदस्‍य अभियानामध्‍ये सहभागी झाले होते.

  भुईकोट किल्‍यातील चांदबिबी महाल, नेताकक्ष, झुलता पूल, जुने दरवाजा व इतर परिसर स्‍वच्‍छ करण्‍यात आला. जिल्‍हाधिकारी कवडे यांनी या अभियानाची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले. सर्वांनी उत्‍स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्‍याबद्दल अभिनंदन करुन या अभियानामुळे इतरांना प्रेरणा मिळेल, अशी आशा व्‍यक्‍त केली. भुईकोट किल्‍ला हस्‍तांतरणाबाबत करार झालेला असून येत्‍या महाराष्‍ट्र दिनी म्‍हणजेच १ मे रोजी हा किल्‍ला नागरिकांसाठी खुला होणार आहे. किल्‍ल्‍याच्‍या परिसरात ग्रंथालय, वृक्षारोपण, डागडुजी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भूषण देशमुख यांनी किल्‍ल्‍यातील ऐतिहासिक घटनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागूल यांनी केले. सहभागी संस्‍था, शाळा, महाविद्यालयांच्‍या प्रतिनिधींना जिल्‍हाधिकारी कवडे यांच्‍या हस्‍ते पुस्‍तक भेट देऊन प्रोत्‍साहित करण्‍यात आले.


  [pslide]
  [item url="#" src="https://2.bp.blogspot.com/-j-DJYewdAyk/WKu6-XxwivI/AAAAAAAAArg/iuPDKCqB2jQOLodLdIIB1CtB4ITPwWwzwCLcB/s640/IMG-20170221-WA0002.jpg" title="भुईकोट किल्ल्याची स्वच्छता"]किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविताना नागरिक[/item]
  [item url="#" src="https://4.bp.blogspot.com/-xX7MZ72AJ-4/WKu6-LtptdI/AAAAAAAAArY/2__Xz47aP_cPAQwdO7LfmR6rBoi2Ku8egCLcB/s1600/IMG-20170221-WA0003.jpg" title="पोलिसांचाही मोठा सहभाग"]सहायक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित हेही स्वतः मोहिमेत सहभागी होते.[/item]
  [item url="#" src="https://4.bp.blogspot.com/-pWGK6IOXeWY/WKu6-PudHOI/AAAAAAAAArc/kBeYWK4TEJkB1iMv2_YqRalTkBPwMVwxQCLcB/s640/IMG-20170221-WA0001.jpg" title="३ हजार नगरकर सहभागी "]नुकताच भुईकोट किल्ल्याच्या हस्तांतरणाचा करार झाल्याने किल्ल्याचे रुपडे पालटणार आहे.[/item]
  [/pslide]

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad