Header Ads

 • Breaking News

  तारकपूर आगारात प्रवाशांचे गुलाबपुष्पाने स्वागत

  अहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे औचित्य साधून प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात अाले. परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवाशांनीही या उपक्रमाचे चांगले स्वागत केले.

  यावेळी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ साहित्यिका लिला गोविलकर, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अशोक जाधव, यंत्र अभियंता उदयसिंग पाटील, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किशोर मरकड, माऊली वितरणचे संचालक सुभाष भांड, प्रा. संजय नगरकर, दक्षता अधिकारी विक्रम भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी जालिंदर शिरसाट, आगार व्यवस्थापक सुनील गायकवाड, आदी उपस्थित होते.

  गोविलकर म्हणाल्या, मराठी भाषा ही गृहस्वामिनी आहे. हिंदी, इंग्रजी आदी भाषा तिच्या मैत्रिणी आहेत. महाराष्ट्रातील संतांनी मराठी टिकविली. इंग्रजी शब्द वापरा पण इंग्रजीचे वर्चस्व टाळा. दररोज मराठी पुस्तकांतील किमान एक पान वाचावे व मराठीतून स्वाक्षरी करा. विभाग नियंत्रक जाधव यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाच्या कामांची माहिती दिली. राम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर सुनील गायकवाड यांनी आभार मानले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad