Header Ads

 • Breaking News

  शाळकरी मुलींचा विनयभंग करणारा शिक्षक गजाआड

  नेवासे । DNA Live24 - नेवासा तालुक्यातील हिंगोणी येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधात शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला त्याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले़ आहे. फक्कडराव नारायण शिंदे, असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.


  नेवासे तालुक्यातील हिंगोणी येथील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या काही अल्पवयीन विद्यार्थीनींशी वर्गशिक्षक फक्कडराव नारायण शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून गैरवर्तन करत होता़. शाळेतील एका मुलीने ही बाब आपल्या पालकांना सांगितली़. त्यानंतर मुलीच्या पित्याने शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षक शिंदे विरोधात फिर्याद दाखल केली.

  शनिशिंगणापूर पोलिसांनी शिंदेविरोधात कलम विनयभंग, जीवे मारण्याची धमकी देणे, या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी शिंदे याला मंगळवारी अटक करण्यात आली. शिंदे हा वर्गातील अनेक विद्यार्थीनी गैरवर्तन करत असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे़ अनेक विद्यार्थिनींनी या शिक्षकाच्या गैरकृत्याचे घरच्यांसमोर कथन केले़. गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरिक्षक वैभव पटेकर यांनी त्याला मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अटक केली़

  Post Top Ad

  Post Bottom Ad