Header Ads

 • Breaking News

  नेवाशात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

  नेवासे । DNA Live24 - बंदपडलेले शासकीय तूर खरेदी केंद्र आठ दिवसांत चालू झाल्यास आंदोलनाचा इशारा नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

  तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी पुरेसा पावसाने उचकी तुरीचे उत्पादन झाले. मागील हंगामात १० हजारांच्या पुढे भाव मिळाला होता, त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून विक्रमी उत्पादन काढले. आता शेतकऱ्यांना जास्त भावाची अपेक्षा असताना व्यापाऱ्यांनी केवळ हजार ५०० ते हजार रुपये भावाने तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यावर शासनाने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.

  महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले हे खरेदी केंद्र आता तूर साठवण्यास जागा नाही, या कारणास्तव बंद करण्यात आले. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन त्वरित तूर केंद्र सुरू करावे; अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, बाजार समितीचे अध्यक्ष कडूबाळ कर्डिले, जबाजी फाटके, संजय जंगले, बाळासाहेब पाटील, नारायण लोखंडे, अनिल पेचे यांच्या सह्या आहेत.

  नेवासे तालुक्याच्या तहसीलदारांना तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन देताना मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर आदी उपस्थित होते. शासकीय तूर खरेदी केंद्र चालू केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आता शासन याकडे काय भूमिका घेते, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad