Header Ads

 • Breaking News

  जिल्हा परिषद निवडणुकीत काळेंची जोरदार मुसंडी

  कोपरगाव । DNA Live24 - जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोपरगाव तालुक्यात अशोक काळेंनी जोरदार मुसंडी मारली आहे. तर पंचायत समितीच्या निकालाने कोल्हे प्रणित भारतीय जनता पक्षाला मोठा हादरा बसला आहे. पंचायत समितीच्या दहापैकी सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकून युवा नेते आशुतोष काळे यांचे वर्चस्व सिद्ध झाले. 

  राष्ट्रवादीने तालुक्यात काँग्रेस सोबत आघाडी केली होती. काँग्रेसला जिल्हा परिषदेत एक पंचायत समितीत दोन जागा मिळाल्या. शिवसेना भाजप वेगवेगळे लढले. दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक-एक जागेवर समाधान मानावे लागले. कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट पंचायत समितीचे १० गट आहेत . चांदेकसारे गटाची निवडणूक रद्द झाली . तेथील निवडणूक प्रक्रिया न्याय प्रविष्ठ आहे. उर्वरित चार गट दहा गणाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसने बाजी मारली. 

  असे आहेत निकाल - 
  जिल्हा परिषद : एकूण गट ०५ - 
  पक्ष - विजयी उमेदवार - मागील जागा 
  (२०१७) - (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०६ - ०६
  काँग्रेस - ०२ - ००
  शिवसेना - ०१ - ०२
  भाजप - ०१ - ००
  मनसे - ०० - ०२

  पंचायत समिती : एकूण गण १० 
  पक्ष - विजयी उमेदवार - मागील जागा 
  (२०१७) - (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०३ - ०३
  काँग्रेस - ०१ - ००
  शिवसेना - ०० - ०१
  भाजप - ०० - ००
  इतर - ०० - ०१


  Post Top Ad

  Post Bottom Ad