Header Ads

 • Breaking News

  श्रीगोंद्यात ३९ उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

  श्रीगोंदा । DNA Live24 - श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहा गटांत २८ उमेदवार उभे होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसच्या सर्वच्या सर्व म्हणजे १२ उमेदवार सोडून उरलेल्या १६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. पंचायत समितीच्या एकूण ५० उमेदवारांपैकी २३, अशा एकूण ३९ उमेदवारांची डिपॉजिट रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या १७ आणि १२ अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.

  पेडगाव गणातील शिवसेनेच्या उमेदवार वैशाली भदे, आढळगाव गणाचे अपक्ष उमेदवार अनुराधा ठवाळ हंगेवाडी गणातील अपक्ष उमेदवार अनिल वीर या तिघांच्या डिपॉजिट रकमा मात्र वाचल्या आहेत. नोटाला पडलेली मते सोडून सर्व उमेदवारांच्या वैध मतांच्या एक अष्टमांशापेक्षा अधिक मते मिळवणाऱ्या उमेदवारांच्या अनामत रक्कम परत मिळणार आहेत. तर उमेदवारी माघार घेणाऱ्या सर्व उमेदवारांच्या देखील डिपॉजिट रकमा परत मिळणार आहेत.

  श्रीगोंदे तालुक्यातील एकूण लाख हजार ११ मतदारांपैकी लाख ५० हजार ९४५ म्हणजे ७३.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये भाजपला ६६ हजार ८८३ म्हणजे ४५ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ हजार ९३९ म्हणजे २४ टक्के, काँग्रेसला ३० हजार ९९५ म्हणजे २० टक्के, शिवसेनेला हजार ४७२ म्हणजे पाच टक्के अपक्षांसह इतरांना हजार १८० म्हणजे पाच टक्के मतदान झाले. नोटाला १४७६ म्हणजे एक टक्का मते पडली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ६७ हजार ९३४ म्हणजे ४५ टक्के मते मिळाली. काँग्रेस आघाडीला तीन आणि भाजपला तीन जागा मिळाल्या.

  Post Top Ad

  Post Bottom Ad