Header Ads

 • Breaking News

  पारनेरात सुजित झावरे यांचा धक्कादायक पराभव

  पारनेर । DNA Live24 - पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले. तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचा धक्कादायक पराभव झाला. पारनेर तालुक्यातजिल्हा परिषद पंचायत समितीत शिवसेनेने आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व अबाधित राखले. 

  शिवसेनेने पारनेर तालुक्यातून जिल्हा परिषदेत दोन जागा, तर पंचायत समितीत चार जागा पटकावुन निर्विवाद वर्चस्व मिळवले. राष्टवादीचे सुजित झावरे, प्रभाकर कवाद, सेनेचे रामदास भोसले, काँग्रेसच्या प्रियंका शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. राहुल नंदकुमार झावरे यांची राजकारणात विजयी सुरवात झाली. पुष्पा वराळ राहुल झावरे यांच्या रूपाने काँग्रेसचा पुन्हा पारनेरमध्ये शिरकाव झाला. सेनेचे काशिनाथ दाते यांचे पुनर्वसन झाले. भाजपला खातेही खोलता आले नाही. पंचायत समितीत आता सेना काँग्रेस यांची युतीची सत्ता येणार आहे. सुजित झावरे यांचा पराभव झाल्याने त्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे स्वप्न भंगले आहे.

  असे आहेत निकाल - 
  पंचायत समिती : एकूण गण १०, पक्ष - विजयी उमेदवार - मागील जागा 
  (२०१७) - (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०४ - ०५
  काँग्रेस - ०२ - ००
  शिवसेना - ०४ - ०७
  भाजप - ०० - ००
  मनसे - ०० - ००

  जिल्हा परिषद : एकूण गट ०५ , पक्ष विजयी उमेदवार मागील जागा 
  (२०१७) - (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०१ - ०३
  काँग्रेस - ०१ - ०२
  शिवसेना - ०२ - ००
  भाजप - ०० - ००
  भाकप - ०१ - ०१


  Post Top Ad

  Post Bottom Ad