Header Ads

 • Breaking News

  श्रीरामपुरात नगरपालिकेप्रमाणेच अनपेक्षित निकाल

  श्रीरामपूर । DNA Live24 - श्रीरामपुरात नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल अनपेक्षित लागले. अनपेक्षित निकालाची परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली. राष्ट्रवादीच्या अविनाश आदिक यांनी ऐनवेळी उभ्या केलेल्या स्वतंत्र पॅनेलमुळे पंचायत समिती निवडणुकीत महाआघाडीच्या तोंडातील सत्तेचा घास हिरावला गेला.

  या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आले नसले, तरी उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे महाआघाडीचा मतांचा टक्का कमी झाला. त्याचा फायदा काँग्रेसला मात्र झाला. गेल्यावेळी पेक्षा एक जागा जास्त मिळाल्याने आता पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस महाआघाडीस चार चार जागांवर समाधान मानावे लागले. पालिकेप्रमाणेच याही निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले. याही निवडणुकीतही मुरकुटेंनी महाआघाडीची हाक दिली होती. मात्र त्यास अविनाश आदिक यांनी पक्षीय आदेशाचे कारण पुढे करून त्यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यांच्यामुळे महाआघाडीला आदिकांच्या भूमिकेचा चांगलाच फटका बसला. 

  असे आहे निकाल - 
  पक्ष - विजयी उमेदवार -  मागील जागा 
  (२०१७)- (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०० - ०३
  काँग्रेस - ०४ - ०५
  शिवसेना - ०० - ००
  भाजप - ०० - ००
  म.आ. - ०४ - ००

  पक्ष - विजयी उमेदवार - मागील जागा 
  (२०१७) - (२०१२) 
  राष्ट्रवादी - ०० - ०२
  काँग्रेस - ०२ - ०२
  शिवसेना - ०० - ००
  भाजप - ०० - ००
  म.आ. - ०२ - ००
  पंचायत समिती : एकूण गण ०८ 
  जिल्हा परिषद : एकूण गट ०४ 

  Post Top Ad

  Post Bottom Ad